Jalna Accident Photo | जालना-नांदेड रोडवर विचित्र अपघात, ट्रकच्या मागच्या बाजूवर कार धडकली, एअरबॅग उघडली अन् जीव वाचले!

राज्यातील रस्ते अपघातांची चिंता काही केल्या संपत नाही आहे. रस्त्यावर उभ्या ट्रकला एका कारनं मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघाताची तीव्रता किती भयंकर होती, याची कल्पना दृश्यांमधून करता येऊ शकेल. या अपघातातून कारमधील प्रवाशी बालंबाल बचावले आहेत.

| Edited By: | Updated on: Apr 13, 2022 | 5:20 PM
1 / 4
जालना नांदेड मार्गावर हा भीषण अपघात झाला. कार चालकाना गाडी कंट्रोन न झाल्यानं भरधाव कार थेट ट्रकच्या मागच्या बाजूवर धडकली आणि आतमध्येच घुसली. या अपघातात कारच्या समोरच्या बाजूचा चक्काचूर झाला आहे.

2 / 4
धडक इतकी भीषण होती की गाडीत समोर बसलेल्या प्रवाशांचं काय झालं असेल, याची कल्पनाच केलेली बरी. मात्र अपघातातून गाडीतील सर्व प्रवाशी बालंबाल बचवाले आहे. वेळीच गाडीतील एअरबँग ओपन झाल्यामुळे गाडीतील प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.

3 / 4
अपघातग्रस्त कार नांदेडकडे जायला निघाली होती. जालन्याहून निघालेल्या या कारचा वाटतेच अपघात झाला. यामध्ये कारचं तर नुकसान झालंच. पण ट्रकच्याही मागच्या बाजूला जोरदार दणका बसला.

4 / 4
या अपघातात कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर कारची एअबॅग उघडल्यानं चालक थोडक्यात बचावला. ट्रकचा टायर पंक्चर झाल्यामुळे हा ट्रक रस्त्यावर थांबला होता. त्यामुळे कार सरळ उभ्या ट्रकला पाठीमागून धडकली.