AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंतरवाली सराटीत लोकांची गर्दी वाढली, जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस, जागा कमी पडत असल्याने रात्रीतच शेतकऱ्याने..

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. मात्र, मार्ग निघू शकला नाही. आता अंतरवाली सराटीत लोक मोठ्या संख्येने जमत आहेत.

अंतरवाली सराटीत लोकांची गर्दी वाढली, जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस, जागा कमी पडत असल्याने रात्रीतच शेतकऱ्याने..
leader Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 30, 2026 | 7:22 AM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. काल जरांगे पाटील उपोषणाला बसले. जास्तीत जास्त मराठा समाजाने घरातून बाहेर पडून या उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. अंतरवालीतून सुरू झालेल्या आंदोलनाला चौथं वर्ष सुरू झाले. मनोज जरांगे पाटील यांच्या दहाव्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून अंतरवालीत लोकांची गर्दी जमत आहे. पहाटे चार वाजेपर्यंत आंदोलक मोठ्या संख्येने येत जात होते. आज देखील मोठ्या संख्येने आंदोलक दाखल होणार असल्याची माहिती मिळतंय. जरांगे यांनी सरकारला अत्यंत मोठा इशारा दिला. विखे फडणवीसांची भाषा बोलत असल्याचेही त्यांनी म्हटले.

अंतरवाली सराटीत जेवणासाठी आणि पार्किंगसाठी जागा कमी पडत असल्याने शेतकरी विजय तारख यांनी अर्धा एकरातील कपाशी उपटून काढली. अंतरवाली सराटीत जेवणासाठी आणि पार्किंगसाठी जागा कमी असल्याने शेतकरी विजय तारख यांनी अर्धा एकरातील कपाशी उपटून काढत जागा उपलब्ध करून दिली आहे. काल आंदोलकांना जागा नसल्याने अडचणी आल्या होत्या. यामुळे रात्रीतून ही कपाशी उपटून काढत जागा तयार करण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी पहाटे 3 वाजेपर्यंत मराठा आंदोलकांची गर्दी. पहाटे 3 वाजता देखील आंदोलक मोठ्या संख्येने येत जात होते.  तर शेकडो आंदोलक उपोषण स्थळासह आसपासच्या परिसरात जिथे जागा मिळेल तिथे आराम करत होते. अनेक मराठा बांधव मुक्कामी, पुढील काही दिवस अंतरवालीतच थांबण्याच्या तयारीत आहेत.

त्यातच आज रविवार असल्याने काही जण अंतरवालीकडे निघाले आहेत. राज्यभरातून मराठा समाजाचे लोक अंतरवालीत दाखल होत आहेत. या येणाऱ्या लोकांना राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली जात आहे. आपल्या काही मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सरकारकडून हे उपोषण थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात आली.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट