Promise Day : ‘प्रॉमिस डे’ला जयंत पाटलांचं शरद पवारांना ‘प्रॉमिस’, काय दिला ‘शब्द’?

आज 'प्रॉमिस डे' चे औचित्य साधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोचवण्याचे प्रॉमिस शरद पवार आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

Promise Day : 'प्रॉमिस डे'ला जयंत पाटलांचं शरद पवारांना 'प्रॉमिस', काय दिला 'शब्द'?
जयंत पाटीलांकडून पुतळा बसवण्याच्या कामाला वेग
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 10:18 PM

मुंबई : सध्या व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू असल्याने सगळीकडे प्रेमाचा बहर आला आहे. त्यात आज तर प्रॉमिस डे (Promise Day) आजच्या दिवशी अनेकजण आपल्या जोरीदाराला वेगवेगळे प्रॉमिस करत असतात. फक्त प्रेमी युगलंच प्रॉमिस करत नाहीत. तर या प्रॉमिस डेचं औचित्य साधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) यांनीही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एक प्रॉमिस केलंय. हे प्रॉमिस त्यांनी एकट्या पवारांना नाही केलं. तर सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही केलंय. आज ‘प्रॉमिस डे’ चे औचित्य साधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोचवण्याचे प्रॉमिस शरद पवार आणि कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे या अनोख्या प्रॉमिसची सध्या प्रॉमिस डेच्या निमित्ताने चर्चा रंगताना पहायला मिळत आहे. सध्या राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे राष्ट्रवादीतल्या इनकमिंगने राष्ट्रवादीला पुन्हा अच्छे दिन आले आहेत.

जयंत पाटलांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?

मंत्री जयंत पाटील यांचे सोशल मीडिया तसे तरुणांमध्ये असणाऱ्या ट्रेंडवर नेहमीच लक्ष असते. सोशल मीडियावर असलेला ट्रेंड ते नेहमीच फॉलोही करतात. सध्या सोशल मीडियावर व्हेलेंटाईन वीकचा ट्रेंड सुरू असून व्हेलेंटाईन वीकमध्ये आज ‘प्रॉमिस डे’ आहे हे लक्षात येताच मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्यकर्त्यांना ट्वीटरवर ‘प्रॉमिस’ केले आहे. जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘आज प्रॉमिस डे’ ! आजच्या या दिनी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आदरणीय शरद पवार साहेबांना शब्द आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, वाडी,वस्तीपर्यंत अत्यंत मजबुतीने बांधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असे प्रॉमिस केले आहे.

भाजपलाही कोपरखिळ्या

राजकीय नेते मंडळी नेहमीच जनतेला आश्वसनं आणि प्रॉमिस करत असतात. जयंत पाटलांनी फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि शरद पावारांनाच प्रॉमिस नाही केलं. तर हे प्रॉमिस करताना भाजप आणि मोदींनाही पुन्हा डिवचलं आहे. मोदी नेहमी जनतेला खोटी प्रॉमिस करतात असा आरोप भाजपच्या विरोधकांकडून होतं असतो. आज प्रॉमिस डेचं औचित्य साधून जयंत पाटीलही मोदींना कोपरखिळी मारायला विसरले नाही. राष्ट्रवादीने मोदींना उद्देशून ट्विट करत. मित्रों, इस बार कौनसा प्रॉमिस मिलेगा दोबारा? असा सवाल विचारला आहे. त्यामुळे त्यांचा रोख कुणाकडे आहे हे सहज स्पष्ट होत आहे.

सरकारमधील मित्रपक्ष ठाण्यात बनले शत्रूपक्ष? सेना-राष्ट्रवादी आमनेसामने, वाद चिघळणार?

फडणवीस म्हणतात भाजपाची वाटचाल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचाराने, तर चंद्रकांत पाटील म्हणतात…

राजकारणातले सिनिअर अजितदादा ज्युनिअर ठाकरे यांच्यात काय चर्चा? महापालिका निवडणुकीतही “एकाच गाडीत”?

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.