AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विकासकामांचा वाद टोकाला, महिलेच्या पोटात लाथ मारली अन्… कल्याणमध्ये पुन्हा राडा

कल्याण तालुक्यातील निंबवली गावात विकास कामांच्या वाटपाबाबत सुरू असलेल्या वादातून भीषण हाणामारी झाली. पोलीस पाटील उर्मिला केने यांच्या पती उमेश केने आणि किरण केने यांच्यात जुना वाद असून, यात उमेशने किरणच्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे.

विकासकामांचा वाद टोकाला, महिलेच्या पोटात लाथ मारली अन्... कल्याणमध्ये पुन्हा राडा
| Updated on: Aug 25, 2025 | 8:46 AM
Share

कल्याण तालुक्यातील निंबवली गावात कामाच्या वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील विकास कामांवरून सुरू असलेल्या जुन्या वादामुळे पोलीस पाटलाच्या पतीवर एका महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे दोन्ही गटांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. ज्यात अनेक जण जखमी झाले. टिटवाळा पोलिसांनी दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याणच्या निंबवली गावातील पोलीस पाटील उर्मिला केने यांचे पती उमेश केने आणि त्याच गावातील रहिवासी किरण केने यांच्यात गावातील कामांच्या वाटपावरून अनेक दिवसांपासून वाद होता. उमेश केने यांचा गट सर्व विकासकामे आपल्यालाच मिळावीत यावर आग्रही होता, तर किरण केने यांचा गटही या कामांमध्ये सहभागी होऊ इच्छित होता. या वादामुळे त्यांच्यात सतत कुरघोड्या सुरु होत्या. तसेच या जुन्या वादामुळे दोन गटांमध्ये तणाव वाढत होता.

आता याच वादातून एका वेगळ्या घटनेचा राग काढत उमेश केने यांनी किरण केने यांच्या पत्नीच्या पोटात लाथ मारली, असा आरोप किरण केने यांनी केला आहे. किरण केने यांच्या म्हणण्यानुसार, समृद्धी महामार्गावर कारला फास्टॅग लावण्यावरून झालेल्या वादाचा राग उमेश केने यांनी काढला. आपल्या पत्नीला मारहाण झाल्याचे पाहून किरण केने संतप्त झाले. त्यांचा उमेश केने यांच्यासोबत मोठा वाद झाला. थोड्या वेळातच हा वाद विकोपाला गेला. त्या दोन्ही गटांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

या हाणामारीत दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले आहेत. काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर दोन्ही गटांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या. यावेळी उमेश केने यांनी गंभीर आरोप केले. गावातील काही लोक त्यांची बदनामी करत होते. याबद्दल जाब विचारण्यासाठी गेलो असता, किरण केने आणि त्यांच्या 4 ते 5 साथीदारांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, असे उमेश केने म्हणाले. तर किरण केने यांनी गावातील सर्व कामे आपल्यालाच मिळावीत यासाठी पोलीस पाटलाच्या पतीने त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

गावात तणावपूर्ण शांतता

या दोन्ही तक्रारींनंतर, टिटवाळा पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या याचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. सध्या कल्याण पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Follow Us
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु