AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती पोस्ट पाहिल्यामुळेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार नाही; करुणा मुंडे यांचा मोठा दावा

स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या करुणा मुंडे यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर वक्तव्य केले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मला बारामतीतून माघार घेण्यासाठी सांगितले होते. मात्र मी एक पोस्ट पाहिली आणि त्यानंतर मी माझा अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असे म्हटले आहे.

ती पोस्ट पाहिल्यामुळेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार नाही; करुणा मुंडे यांचा मोठा दावा
Sunetra PawarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 09, 2026 | 6:34 PM
Share

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये विधानसभेची पोटनिवडणुक आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व प्रयत्न केले जात होते. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. काँग्रेसकडून या निवडणुकीत उमेदवार देण्यात आला होता. कारण, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता सर्व प्रयत्न सुरु होते. नंतर काँग्रेसनेही माघार घेतली. पण स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या करुणा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी कायम ठेवण्याचा ठाम निर्णय स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या करुणा मुंडे यांनी जाहीर केला आहे. करुणा मुंडे यांनी एका विशेष बाईटमध्ये सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मला बारामतीतून माघार घेण्यासाठी सांगितले होते. मात्र मी एक पोस्ट पाहिली आणि त्यानंतर मी माझा अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.” त्यांनी स्पष्ट केले की, “धनंजय मुंडे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बोलणी केल्यानंतर काँग्रेसने माघार घेतल्याची पोस्ट मी पाहिली. त्यामुळे मीही माघार घेणार नाही.”

करुणा मुंडे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत सांगितले, “अजित पवारांना आम्हाला न्याय द्यायचा आहे, पण सुनेत्रा पवार आणि त्यांचे मुलगे अपघाताविषयी काहीही बोलत नाहीत. मोठे सत्ताधारी न्याय देऊ शकत नाहीत, त्यांना सत्तेत बसण्याचा हक्कच नाही.”

पुढे त्या म्हणाल्या की, “माझा स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय पक्ष आहे. आमचे कार्यकर्ते आम्हाला मतदान पडू द्या. मी बारामतीत हेच मुद्दे घेऊन चालणार आहे. कोणालाही न्याय मिळणार नाही असे वातावरण आहे. मी वाईट गोष्टींच्या विरोधात लढणार आहे.” करुणा मुंडे यांनी आपल्या राजकीय आदर्शाविषयीही बोलताना सांगितले, “छत्रपती संभाजीराजे हे माझे राजकारणातील आयडॉल आहेत. आपले महापुरुषांचे विचार घेऊन आम्ही चालणार आहोत.”

धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी खळबळजनक दावा केला, “धनंजय मुंडे यांनी मला लायकी नाही असे सांगितले. त्यांनी संपर्क केल्यामुळे काँग्रेसने माघार घेतली, असे वाटते. काँग्रेसला तुम्ही विकत घेऊ शकता, पण मला नाही.”

शेवटी करुणा मुंडे यांनी आत्मविश्वासाने सांगितले, “हारले तरी मी जिंकल्यासारखीच असणार आहे. मी लढणार आहे.” तसेच त्यांनी दादांची एफआयआर लागल्याचीही माहिती दिली. करुणा मुंडे यांचा हा ठाम निर्णय आणि सत्ताधाऱ्यांवर केलेला हल्ला बारामती पोटनिवडणुकीत नवीन वळण आणणारा ठरू शकतो. बारामतीत आता त्रिकोणी लढत होण्याची शक्यता वाढली आहे.

Follow Us
MPSC FDA पेपरफुटी: अभिमन्यू पवारांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
औषध निरीक्षक परीक्षा रद्द: पेपरफुटीमागे कोण?
एका प्रियकरामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका
MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती,
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती, असं काही केलं की...
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...