AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅट जीपीटी ते सिनेमा…! केतन अग्रवालला मारण्यासाठी काय प्लान आखला होता? 5,053 पानांच्या चार्जशीटमधून चक्रावणारे खुलासे

केतन अग्रवालला संपवण्यासाठी तिघांनी प्लान आखला होता. या प्रकरणातील 5,053 पानांच्या चार्जशीटमधून चक्रावणारे खुलासे समोर आलं आहे.

चॅट जीपीटी ते सिनेमा...! केतन अग्रवालला मारण्यासाठी काय प्लान आखला होता? 5,053 पानांच्या चार्जशीटमधून चक्रावणारे खुलासे
Ketan agarwal newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 20, 2026 | 10:29 AM
Share

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. या प्रकरणाचा लोणावळा पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. केतन अग्रवाल प्रकरणी कोर्टात 5,053 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आता खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाणार आहे. आतापर्यंत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर चार्जशीटमधून चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे.

अपंग करण्याचा प्लान 

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रात तीन आरोपी आहेत. सिया, चेतन, रितेश हरांगे या तिघांनी मिळून त्याला सुरुवातीला अपंग करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून कट रचून परराज्यातील व्यक्तीकडून त्याला गंभीर दुखापत करायचा प्लान आखला. परराज्यातील अनेक व्यक्तीशी संपर्क केल्याचे समोर आलं आहे. पण तो व्यक्ती सापडला तर अडचण येऊ शकते, त्यामुळे तिघांनी निर्णय बदलला. यामधील एक व्यक्ती या प्रकरणात साक्षीदार झालाय. या नंतर तिघांनी स्वतः मारून टाकू अस ठरवलं, त्यासाठी यासंदर्भातील सिनेमा पाहिले चॅटीजीपीटीचा उपयोग केला. या दरम्यान त्यांनी मेघालयमधील सोनम केसची स्टडी केली. 29 मे महिन्याच्या शेवटी सिया आणि चेतन यांनी टायगर पॉईंटला जाऊन रेकी केली. टायगर पॉईंटला सीसीटीव्ही नसल्याचं त्यांचा लक्ष्यात आलं. लोणावळातील अनेक डोंगराची रेकी केली.

तिघांनी लोहागड किल्ला कसा निवडला?

लोहगडमध्ये मार्च 2025 मध्ये लोहगडावर एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यावरून लोकांना वाटेल, केतन सेल्फी घेताना पडला. त्यासाठी 4 जून रोजी सियाने लोहगडावर जाण्याचा हट्ट केला. तिने बालीला जाण्यापूर्वी खून करायचा होता. 6 जून रोजी प्री वेडिंग शूटसाठी बालीला निघाले होते, जाताना सियाने खालापूरमध्ये कॅफेत केतनचा पासपोर्ट वॉशरूममध्ये फाडून फेकून दिल्याचे समोर आलंय. त्यामुळे ते बालीला जाऊ शकले नाहीत. त्यानंतर 14 जून रोजी सिया आणि केतन लोहगडावर गेले, सियाने केतन अग्रवालला ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पडला नाही, त्यामुळे सियाने साप आला साप आला असा बनाव केला, मात्र यश आलं नाही.

तिघांनी मिळून माही नावाचं फेक इंस्टाग्राम अकाउंट बनवलं होतं. 18 जून रोजी माही नावाचा अकाउंट वरून सियाची मैत्रीण आहे, केतनला सांगितलं, तुम्ही सियाला लोहगडावर घेऊन या…आपण सियाचा वाढदिवस साजरा करू आणि तिला सरप्राईज देऊ, हे सगळं रितेश हांगे प्लान करत होता. चेतन हा एक्झिट मार्गाने गडावर गेला. त्यानंतर सियाने त्याला वर जाण्यास सांगितलं. चेतन वर जाऊन गडावरील मंदिरात जाऊन बसला. केतनचं लक्ष नसताना सियाने पाठीमागून खांद्याला धक्का दिला. त्यानंतर चेतनने देखील पायला धक्का दिला. त्यानंतर चेतनने लाथ मारून केतनला खाली पडला. यात केतनचा मृत्यू झाला. रितेश हांगे याने हा सगळा कट रचला होता.

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले