Kokan Rain : थिविम ते करमळीदरम्यानच्या बोगद्यात रेल्वेरुळावर मोठा चिखल, कोकण रेल्वेवर परिणाम, 5 गाड्यांचा मार्ग बदलला

थिविम ते करमळीदरम्यान रेल्वेच्या ओल्ड गोवा बोगद्यात रेल्वेरुळावर मोठा चिखल आणि मादी रेल्वेरुळावर आली आहे. त्याचा परिणाम कोकण रेल्वेवर झालाय. 5 गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहे.

Kokan Rain : थिविम ते करमळीदरम्यानच्या बोगद्यात रेल्वेरुळावर मोठा चिखल, कोकण रेल्वेवर परिणाम, 5 गाड्यांचा मार्ग बदलला
ओल्ड गोवा टनेमध्ये रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि माती
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 2:38 PM

रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. पुढचे 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. अशावेळी थिविम ते करमळीदरम्यान रेल्वेच्या ओल्ड गोवा बोगद्यात रेल्वेरुळावर मोठा चिखल आणि मादी रेल्वेरुळावर आली आहे. त्याचा परिणाम कोकण रेल्वेवर झालाय. 5 गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहे. या गाड्यांमधील प्रवाशांना अन्य गाड्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं आहे. (Mud-soil on the railway track in the Old Goa tunnel on the Konkan Railway)

मडगावकडे जाणाऱ्या सर्वच गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे सलग चौथ्या दिवशी कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झालाया. चार दिवसांपूर्वी दक्षिण रेल्वे मार्गावर दरड कोसळली होती. त्यानंतर दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तीन दिवस कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झालं होतं.

रुळावरील माती काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाची यंत्रणा कामाला

आता चौथ्या दिवशी ओल्ड गोवा टनेलमध्ये दरड कोसळल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. गेले आठ दिवस कोकण विभागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याचा परिणाम रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी होऊ लागला आहे. गोवा बोगद्यात कोसळलेल्या दरडीचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. त्यामुळे नेत्रावती एक्स्प्रेस थिविम स्थानकात, पेडणे येथे वास्को एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस कुडाळला थांबवून ठेवण्यात आली आहे. रुळावरील माती काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली आहे. तर सकाळपासून कर्नाटक-केरळकडे जाणारी सर्वच वाहतूक ठप्प झाली आहे.

दरड कोसळल्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे गाड्यांचं वेळापत्रक खोळंबलं आहे. काही गाड्या वेगळ्या मार्गांवरून वळवण्यात आल्या आहेत. रुळांवरील पाणी आणि दरड बाजूला करण्याचं काम सुरु आहे. रेल्वे सेवा कधी पूर्वपदावर येणार याबद्दल अद्याप कोणतीही खात्रीलायक माहिती नाही.

कोणत्या रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले

ट्रेन नं: 02618 – निझामुद्दीन-एर्नाकुलम डेली स्पेशल

ट्रेन नं : 04696 – अमृतसर – कोचुवेली विकली एक्सप्रेस

ट्रेन नं : 01224 – एर्नाकुलम जक्शन- लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो विकली स्पेशल

ट्रेन नं : 09261 – कोचुवेली – पोरबंदर विकली स्पेशल

ट्रेन नं : 02977 – एर्नाकुलम जंक्शन – अजमेर जंक्शन विकली स्पेशल

संबंधित बातम्या :

Raigad rain update : संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाचं थैमान, नद्या ओव्हर फ्लो, माथेरान अंधारात

Maharashtra Rain Update : कोकण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट, कोकणात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, मुसळधार सुरुच

Mud-soil on the railway track in the Old Goa tunnel on the Konkan Railway

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.