गुरुजींच्या सभेत राडा, मुलांना शिकवणारे शिक्षकच एकमेकांच्या अंगावर धावून गेले, नेमकं घडलं काय?

कोल्हापुरात गुरुजींच्या सभेत राडा झाला. मुलांना शिकवणारे शिक्षकच एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने सभेत गोंधळ उडाला.

गुरुजींच्या सभेत राडा, मुलांना शिकवणारे शिक्षकच एकमेकांच्या अंगावर धावून गेले, नेमकं घडलं काय?
kolhapur news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 28, 2026 | 9:21 AM

कोल्हापुरात प्राथमिक शिक्षक सहकारी बँक आणि वाद हे समीकरण झालं आहे. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्षकांचा राडा आता नेहमीचं ठरलं आहे. मागील अनेक वर्षांत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुजींच्या दोन गटात वाद झाल्याचे समोर आलं आहे. काल झालेली वादळी चर्चा देखाली वादाला अपवाद ठरली नाही. कोल्हापुरात यंदा झालेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरूजींचा राडा झाल्याचे समोर आले. बँकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटातील गुरुजी एकमेकांच्या अंगावर धावून गेले, त्यामुळे ही सभा प्रचंड गोंधळात पार पडली.

कोल्हापुरात काल रविवारी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सभा झाली. ही सभा बँकेचे चेअरमन बाबुराव परीट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कर्जावरील व्याजदर, दोन अंकी लाभांश वाटप, संचालकांची संख्या 17 वरून 21 वर करण्याविषयी सभेत चर्चा झाली. यंदा दहा दोन अंकी लाभांश वाटपाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या संचालक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचे समोर आलं. दोन्ही गटाचे सभासद आक्रमक होत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वादामुळे सभेचे क्षणात चित्र बदललं. सभेच्या प्रास्ताविकापासून गोंधळ सुरू झाला. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या वेळेपर्यंत सुरूच राहिल्याचे दिसून आलं. सभेत प्रचंड गोंधळ आणि आरडाओरड झाली. त्यानंतर घरातच सत्ताधारी गटांनी अनेक विषयांना मंजुरी घेतली, त्यानंतर संचालकांची संख्या वाढवण्याला मान्यता घेण्यात आली, अशी माहिती आहे.

बँकेला झालेला नफा खरा की खोटा, असा प्रश्न काहींनी विचारला. तर आजरा, गडहिंग्लज, मुरगुड वारणा अशा शाखांमध्ये पुरेसे कर्मचारी आहेत. त्यानंतर नफ्याचे प्रमाण कमी का, असे विविध सवाल विरोधी गटाने विचारले. या प्रश्नांनाही समाधानकारक उत्तर मिळाला नसल्याचा दावा विरोधी गटाने केला. खरंतर संपूर्ण राज्यात या शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभेची चर्चा होते. काही वेळा तर या सभेमध्ये गुरुजींनी जोरदार हाणामारी केल्याचे पाहायला मिळालं होतं. यंदा देखील गुरुजींनी एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी वादाची परंपरा जपली असंच म्हणावं लागेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us