कोल्हापूरच्या कोयना तसेच होसपेट एक्सप्रेसना आधुनिक एलएचबी डब्यांचा साज, केव्हापासून सेवेत येणार ?

मध्य रेल्वे प्रशासनाने आता खालील गाड्यांमध्ये पारंपारिक आयसीएफ रेकऐवजी एलएचबी रेकचा वापर करणार आहे. आणि या ट्रेनच्या डब्याची रचना कायमस्वरूपी बदलण्यात येणार आहे.

कोल्हापूरच्या कोयना तसेच होसपेट एक्सप्रेसना आधुनिक एलएचबी डब्यांचा साज, केव्हापासून सेवेत येणार ?
LHB COACH NEWS
| Updated on: Nov 04, 2026 | 6:34 PM

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर धावणाऱ्या गाडी क्रमांक 11029/11030 आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते होसपेट धावणाऱ्या एक्सप्रेसना पारंपारिक आयसीएफ डब्यांच्या ऐवजी आता आधुनिक एलएचबी डब्यांचा साज देण्यात येणार आहे. या आधुनिक डब्यांमुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. पुढील वर्षांपासून हा बदल करण्यात येणार आहे.

कोल्हापूर ते मुंबई कोयना एक्सप्रेसना असलेल्या पारंपारिक रेकच्या ऐवजी आता एलएचबी रेकमध्ये रूपांतर आणि कायमस्वरूपी सुधारित डब्याची रचना करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये आता १ वातानुकूलित द्वितीय, ३ वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी, १ जनरेटर कार आणि १ द्वितीय आसनासह व लगेज सह गार्ड्स ब्रेक व्हॅन (एकूण १८ एलएचबी डबे) असणार आहेत.

Loading...

 

सुधारित डब्याची रचना लागू होण्याची तारीख:

• गाडी क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर ‘कोयना एक्सप्रेस’ दिनांक १२ जानेवारी २०२७ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून एलएचबी रेकसह आणि सुधारित रचनेनुसार चालवण्यात येईल.

• गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ‘कोयना एक्सप्रेस’ दिनांक १० जानेवारी २०२७ पासून कोल्हापूर येथून एलएचबी रेकसह आणि सुधारित रचनेनुसार चालवण्यात येईल.

• गाडी क्रमांक 11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – होसपेट एक्सप्रेस, दिनांक १० जानेवारी २०२७ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून एलएचबी रेकसह आणि सुधारित रचनेनुसार चालवण्यात येईल.

• गाडी क्रमांक 11140 होसपेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, दिनांक ११ जानेवारी २०२७ पासून होसपेट येथून एलएचबी रेकसह आणि सुधारित रचनेनुसार चालवण्यात येईल.

या गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी आणि थांब्यांची माहिती मिळवण्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी कृपया वरील बदलांची नोंद घ्यावी.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us