बाब्बो! मुंबई लोकलमध्ये चढूच शकत नाही; कोरियन पर्यटकाने जगाला दाखवलं विदारक वास्तव, VIDEO

एका कोरियन पर्यटकाने मुंबई लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला ऐन गर्दीत लोकलमध्ये चढता आले नाही. त्यानंतर त्याने लोकलच्या गर्दीचा अनुभव इन्स्टाग्रामवर सांगितला.

बाब्बो! मुंबई लोकलमध्ये चढूच शकत नाही; कोरियन पर्यटकाने जगाला दाखवलं विदारक वास्तव, VIDEO
mumbai local video viral
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 18, 2026 | 6:49 PM

मुंबईत लोकलमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावर प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतोय. गर्दीच्या वेळी प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. प्रवासी एकमेकांना धक्के देऊन लोकलच्या डब्यात घुसत असतात. लोकल गर्दीतून पडून अनेक प्रवाशांनी जीव देखील गमावले आहेत. त्यामुळे भारताबाहेरच्या एखाद्या नागरिकाला मुंबई लोकलमधून प्रवास करणे फार आव्हानात्मक आहे. लोकल गर्दीमुळे भारताबाहेरचा नागरिक मुंबईत आला, तर कार, टॅक्सीने प्रवास करतो. परंतु एका कोरियन नागरिकाने मोठ्या धाडसाने लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्याकडून शक्य झाले नाही. त्यानंतर त्याने मुंबई लोकलच्या गर्दीचं विदारक वास्तव संपूर्ण जगाला दाखवलं.

मुंबईल लोकलने पहिल्यांदाच प्रवास करू इच्छिणाऱ्या कोरियन पर्यटकाने संपूर्ण जगाला अनुभव सांगितला. खरंतर तो रेल्वे स्टेशनवर गर्दीत ट्रेनची वाट पाहताना घामाने भिजून गेला. ऐन गर्दीच्या वेळी या पर्यटकाला लोकलमध्ये चढताच आले नाही. मुंबईकरांची लोकल पकडण्याची कसरत पाहून या पर्यटकाने भरभरून कौतुक केलं. त्याने व्हिडिओ शेअर करत मुंबई लोकल गर्दीचा अनुभव सांगितला. सकाळी 8 वाजणाच्या सुमारास लोकल ट्रेनने प्रवास करणे प्रवाशांसाठी तारेवरची कसरतच असते. खरंतर तुम्ही कोणत्याही वेळेला गेला तरी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या जास्तच दिसून येते. मुंबईकर घडाळ्याच्या काट्यावर चालतात, याची प्रचिती लोकलच्या गर्दीला पाहूनच येते.

मुंबई लोकलचा प्रवास करण्यासाठी एक कोरियन पर्यटक भारतात आला. त्याने ठाणे ते सीएसएमटी प्रवास करण्याचे ठरवले. परंतु त्याला प्लॅटफॉर्मवर कित्येक तास ट्रेनमध्ये उभे राहूनही लोकलमध्ये चढता आले नाही.  त्यानंतर हा पर्यटक नाईलाजाने टॅक्सी करून निश्चित स्थळी पोहोचला. त्याने लोकलमध्ये प्रवास करण्यास न जमल्याने व्हिडिओमध्ये खंत व्यक्त केली. आता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

 

सोजिन असे दक्षिण कोरियन पर्यटकाचे नाव आहे. त्याने sejinandworld या इन्स्ट्राग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने ठाणे स्टेशनवरून फर्स्ट क्लासचे 170 रुपये देऊन रिटर्न तिकीट काढले. त्याने प्लॅटफॉर्मवर येऊन लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रचंड गर्दी पाहून गोंधळून गेला. त्याने एकापाठोपाठ दोन ट्रेन सोडल्या. त्यानंतर त्याने लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा प्रयत्न सोडून दिला. त्यानंतर थेट टॅक्सीने प्रवास सुरू केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us