AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत सर्वात मोठी घोषणा

ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून, लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत सर्वात मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 09, 2026 | 6:18 PM
Share

राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे.  ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने आता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ई-केवायसीची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून, सुरुवातीला नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.  त्यानंतर 31 डिसेंबर, 31 मार्च आणि आता पुन्हा एकदा 30 एप्रिलपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे.  दरम्यान, केवायसी पोर्टल वारंवार बंद राहणे, तांत्रिक अडचणी आणि प्रक्रिया पूर्ण करताना येणाऱ्या अडथळ्यांमुळे अनेक महिलांना केवायसी करता आली नव्हती. काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्यांचा योजनेचा लाभही थांबला होता. महिलांकडून आलेल्या तक्रारी आणि सूचनांचा विचार करूनच ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती यावेळी  मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

राज्य शासनाने यासाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून दिले आहे, महिलांनी या अतिरिक्त कालावधीत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन यावेळी तटकरे यांनी केलं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा केवायसीची मुदत वाढवण्यात आल्यामुळे या योजनेचा मोठा फायदा ज्यांची केवायसी अद्याप बाकी आहे, किंवा केवायसीमध्ये काही तांत्रिक चूका झाल्या आहेत, त्यांना होणार आहे. शासनाच्या  या निर्णयामुळे या योजनेतील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेतंर्गत दर महिन्याला या योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही योजना राज्यातील महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत देखील मोठा फायदा झाला.  आमचं सरकार सत्तेत आल्यास आम्ही महिलांना मिळणाऱ्या सन्मान निधीमध्ये वाढ करू असं अश्वासन देखील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीकडून देण्यात आलं होतं. मात्र आता राज्यात महायुतीचं सरकार येऊन दीड वर्ष झालं आहे, परंतु अजूनही यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. सन्मान निधीमध्ये कधी वाढ होणार? याकडे आता राज्यातील महिलांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!