AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lad ki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? फडणवीसांची सभागृहातून गुड न्यूज, अखेर तारीख समोर

लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात पाच हपते जामा करण्यात आले आहेत, मात्र आता डिसेंबरचा हपता कधी जमा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Lad ki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? फडणवीसांची सभागृहातून गुड न्यूज, अखेर तारीख समोर
| Updated on: Dec 19, 2024 | 3:16 PM
Share

अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. ही एक सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर जुलैपासून लगेचच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जुलैपासूनचे ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हापते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र आता डिसेंबरचा हपता सरकार कधी जमा करणार? खात्यामध्ये पैसे किती जमा होणार? 1500 की 2100 याकडे आता सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सभागृहात दिली आहेत.

नागपुरात हिवाळी अधिवेश सुरू आहे. यावेळी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील हल्लाबोल केला. आम्ही जी आश्वासनं दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. कुणीही मनात शंका ठेऊ नये. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, असं फडणवीस यांनी यावेळी सभागृहात म्हटलं.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?  

आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीयेत.  आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत.

काय आहेत लाडकी बहीण योजनेचे निकष? 

अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली. ज्या कुटुंबाचंं आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.  ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.  निकष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक अर्जदार महिलेला या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात आतापर्यंत दर महिन्याला 1500 याप्रमाणे पाच हपते जमा झाले आहेत.

Follow Us
डायर नाही, कायर पाहिला! लाठीचार्जवर देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
Sandeep Deshpande | जनरल डायर नाही, कायर पाहिला! विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर संदीप देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा!
Ritesh-Genelia Deshmukh | युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला.

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला

Video : थोडीतरी लाज बाळगा, किती सलाम ठोकणार..,’ पोलिसांचा CJP आंदोलकांवर लाठीचार्ज, प्रसिद्ध गायकाचा संताप.

Video : थोडीतरी लाज बाळगा, किती सलाम ठोकणार..,’ पोलिसांचा CJP आंदोलकांवर लाठीचार्ज, प्रसिद्ध गायकाचा संताप

CJP Protest: आजही संसदेपर्यंत सीजेपीचा मार्च? अभिजीत दिपकेंचे मोठे वक्तव्य, काय आहे प्लॅन?.

CJP Protest: आजही संसदेपर्यंत सीजेपीचा मार्च? अभिजीत दिपकेंचे मोठे वक्तव्य, काय आहे प्लॅन?

Share Market: शेअर मार्केटमध्ये घसरण कायम, सोमवारच्या ग्लोबल क्रॅशनंतर मंगळवारीही भारतीय शेअर बाजारही कोसळला.

Share Market: शेअर मार्केटमध्ये घसरण कायम, सोमवारच्या ग्लोबल क्रॅशनंतर मंगळवारीही भारतीय शेअर बाजारही कोसळला

विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे निघाले, सरकारसमोर दुहेरी संकट, रस्त्यांवर बॅरिगेट्स, पोलिस पुन्हा अलर्ट.

विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे निघाले, सरकारसमोर दुहेरी संकट, रस्त्यांवर बॅरिगेट्स, पोलिस पुन्हा अलर्ट