Lalbaugcha Raja Jaideep Nemade Dies : लागबागच्या राजाच्या दर्शनाला गेला, तरुण पुन्हा परतलाच नाही; कुटुंबातील सदस्य मंडळाबद्दल काय म्हणाले?
लागबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. जयदीपच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्य काका नेमाडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले.

मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जवळगावातील तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. जळगावच्या जीवनमोती नगरमधील जयदीप नेमाडे हा मित्रांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईला आला होता. राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असताना त्याला अचानक चक्कर आली. त्यानंतर तो खाली पडला. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याचा उपाचारापूर्वी मृत्यू झाला. जयदीपच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
जयदीप नेमाडे हा लालबागच्या राजाचा भक्त होता. तो गेल्या अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात होता. जयदीप हा चार मित्रांना घेऊन पुण्याहून मुंबईला आला होता. 17 सप्टेंबर रोजी दर्शनासाठी रांगेत उभा होता. रांगेत अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. रांगेत असताना चक्कर येऊन जमीनीवर कोसळला. जयदीपची प्रकृती गंभीर झाल्याने रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. जयदीपसोबत त्याचे मित्र होते. त्यांनी त्याच्या कुंटुबीयांना माहिती दिली, त्यानंतर घरातील मंडळी मुंबईला रवाना झाले. त्याचे जयदीप नेमाडे याचे काका प्रमोद नेमाडे यांनी पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, तो माझ्या पुतण्या असला तरी मुलासारखा होता. तो दरवर्षी लालबाग राजाच्या दर्शनाला जायचा. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे’.
हृदय विकाराच्या झटक्याने जयदीपचा मृत्यू
‘त्याला कोणताही आजार नव्हता. हे सगळं अचानक घडलं. तो पुण्यात नोकरी करत होता. मेकॅनिकल इंजिनीअरचा डिप्लोमा केला होता. त्याचबरोबर त्याने इंडो-जर्मन टूल रुममध्ये टूल कटिंगचा कोर्स केला होता. दर्शनाच्या रांगेत गर्दी होती. त्यामुळे त्याला गुदमरल्यासारखे झाल्याचे मित्रांनी सांगितलं. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. खरंतर भक्तमंडळी लांबून येतात, त्यांना दर्शनासाठी खूप वेळ लागतो. मंडपात व्हेंटिलेशन नाही, त्यामुळे भक्तांना श्वास घेण्यास त्रास होतो. गर्दीत जीव गुदमरतो. त्यामुळे व्यवस्थापन आणखी चागंले केले पाहिजे, असे जयदीपचे काका नेमाडे यांनी सांगितले.