Latur Currier Blast: धक्कादायक, कुरिअर पार्सल उतरवताना लातूरमध्ये भीषण स्फोट, घातपात की दुसरंच काही? एक जण गंभीर जखमी

Latur Courier Tempo Blast: लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात कुरियर घेऊन आलेल्या एका टेम्पोमध्ये स्फोट झाला आहे. त्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांसह फॉरेन्सिक टीम आणि दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी पोहचले आहे.

Latur Currier Blast: धक्कादायक, कुरिअर पार्सल उतरवताना लातूरमध्ये भीषण स्फोट, घातपात की दुसरंच काही? एक जण गंभीर जखमी
कुरिअर पार्सल उतरवताना लातूरमध्ये भीषण स्फोट, घातपात की दुसरंच काही?
| Updated on: Oct 31, 2026 | 2:12 PM

Latur Courier Tempo Blast: लातूर शहरात कुरियर घेऊन आलेल्या एका टेम्पोमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात टेम्पोचं मोठं नुकसान झालं आहे कुरिअरचे बॉक्सेस उतरवून घेताना हा स्फोट झाला आहे. स्फोट नेमका कोणत्या वस्तूचा झाला हे मात्र अद्याप कळलेलं नाही. मात्र या घटनेत एक जण गंभीर रित्या जखमी झाला आहे. टेम्पो मधून आणलेल्या वस्तू उतरवून घेण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी स्फोट झाला आहे. या स्फोटात टेम्पोचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर इतर वस्तूंचे नुकसान झाला आहे.

या घटनेत एक जण गंभीर जखमी

Loading...

कुरिअरचे पार्सल खाली उतरवत असताना या टेम्पोमध्ये भीषण स्फोट झाला. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुरिअरच्या वाहनातून पार्सल खाली उतरवताना हा स्फोट घडला. हा स्फोट कसा घडला. कोणते पार्सल होते. ते कुठून आले होते. त्यात ज्वलनशील पदार्थ होता, स्फोटकं होती तर त्याची माहिती कुरिअर कंपनीला देण्यात आली होती का? याविषयीचा तपास आता करण्यात येत आहे. पार्सलमधून स्फोटकं पाठवण्यात आली होती का? याचाही तपास पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा करत आहेत. या स्फोटामुळे संशय बळावला आहे. तर कुरिअर कंपनीतील कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.

वाहनात आढळली बंदुक, स्फोटाचे कारण काय?

या घटनेची माहिती मिळताच लातूर पोलीस आणि फॉरेन्सिक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. पण ही स्फोटकं नेमकी कोणी आणि कुठून पाठवली. त्याची माहिती कुरिअर कंपनीला होती का? स्फोट कशामुळे झाला, याची कारणं समोर आलेली नाहीत. त्याचा तपास पथकाने सुरू केला आहे. अजून एक धक्कादायक बाब म्हणजे या कुरिअर वाहनामध्ये एक बंदुक देखील आढळून आल्याने तपास यंत्रण अलर्ट झाल्या आहेत. स्फोटकं आणि बंदुक कोणाची आहे, याचा तपास यंत्रणा करत आहेत. या घटनेत एक जण गंभीर झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us