
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पावर आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर टीका केली होती, त्याला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर निशाणा साधला होता, त्याला आता लक्ष्मण हाके यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले हाके?
निवडणुकीत मी पराभूत झालो, पण अजित पावरांना त्यांच्या पोराला अजून निवडून आणता आलं नाही. अमोल मिटकरी मला वाय झेड म्हणाले, पण धनगराची पोरं या अमोल मिटकरींच्या एका खानाखाली वाय आणि दुसऱ्या गालात झेड काढल्याशिवाय राहणार नाहीत. एखाद्याला वाय झेड म्हणणे म्हणजे काय? ठीक आहे ते हे बोलले पण मी जे प्रश्न उपस्थित केले त्यावर उत्तर द्या. एका बाजूला सारथीची टोलेजंग इमारत उभी होते, पण आम्हाला बसायला ऑफिस भेटत नाही. ओबीसींना जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह मिळणार आहे की नाही? असा सवाल यावेळी हाके यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, अमोल मिटकरी हे घासलेट चोर आहेत, अमोल मिटकरी आणि अजित पवार यांना घटनेची प्रस्तावना माहिती नाही, मिटकरी स्वत:ला ओबीसी म्हणतात पण त्याबाबत ते कधी सभागृहात बोलले आहेत का? निवडणुकीत मी पराभूत झालो पण अजित पावरांना त्यांच्या पोराला अजून निवडून आणता आलं नाही. मग त्यावरून त्यांची लायकी काढणार का? असा हल्लाबोल यावेळी लक्ष्मण हाके यांनी केला आहे. लढायला आम्ही आणि तूप रोटी खायला पवार फॅमिली कशाला लागते? महाराष्ट्र मंत्रिमंडळात गोपीचंद पडळकर यांना अजून मंत्रिपद का दिलं नाही? तुम्ही छगन भुजबळ यांना का डावलले असा सवालही यावेळी हाके यांनी केला आहे. दरम्यान ‘मिटकरी आपण वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहात. या सदसत्वाला शोभेल अशी भाषा तुम्ही वापरा, आम्ही जर बोलायला लागलो तर तुमचे सोडा, तुमच्या आकाचेही कपडे अंगावर राहणार नाहीत असा इशाराही हाके यांनी गुरुवारी मिटकरी यांना दिला होता.