LIVE : समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव , मंत्रिमंडळाची मंजुरी

, LIVE :  समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव , मंत्रिमंडळाची मंजुरी
, LIVE :  समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव , मंत्रिमंडळाची मंजुरी

शिवसेनेवर कोणी दबाव टाकू शकत नाही : संजय राऊत

संजय राऊत : व्होट बँक राजकारणाला आमचा विरोध आहे. सगळ्यात वाईट अवस्था नेपाळची आहे. आम्हाला ज्या शंका आहेत त्या आम्ही संसदमध्ये मांडणार. जर आम्हाला उत्तर मिळाले नाही, तर आम्ही त्यांना विरोध करणार. या देशाचे जे देशभक्त आहेत, त्यांना प्रमाणपत्राची गरज नाही. लोकसभेचे समीकरण वेगळे होते, राज्यसभेचे वेगळे आहेत.शिवसेनेवर कोणी दबाव टाकू शकत नाही. मानवतेच्या हिताचे आहे, त्यांची आम्ही बाजू घेणार

11/12/2019,11:31AM
, LIVE :  समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव , मंत्रिमंडळाची मंजुरी

भातसा धरणाचा एक दरवाजा उघडून मुंबईला पाणी सोडलं

मुंबईला पाणी कमी पडल्याने मुंबईच्या मागणीनुसार भातसा धरणाचा एक दरवाजा खोलून मुंबईला 2 हजार क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे   भातसा धरणाचे दोन दरवाजे उघडून मुंबईला पाणी पुरवठा करण्यात आला.मात्र या अचानक दरवाजा उघडून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भातसा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने अनेक तर्क वितर्क वर्तविण्यात येत आहेत.   शहापूर तालुक्यातील मुंबईला सर्वात जास्त पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाचा एक दरवा उघडून आज भातसा नदी मधून मुंबईला अधिकचा पाणीपुरवठा करण्यात आला आहे

11/12/2019,10:05AM
, LIVE :  समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव , मंत्रिमंडळाची मंजुरी

बिल्डर डी एस कुलकर्णी सहकुटुंब अटकेत

सांगली – पुण्यातील बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाला अटक, डीएसके ग्रुप कंपनी मार्फत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई, सांगली शहर पोलिस ठाण्यात कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुलकर्णी यांच्यावर केली अटकेची कारवाई.

11/12/2019,9:46AM
, LIVE :  समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव , मंत्रिमंडळाची मंजुरी

ओबीसी नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मुंबई : ओबीसी नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार, दुपारी 1 वाजता घेणार मंत्रलयात भेट, प्रकाश शेंडगे आणि ओबीसी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, आरक्षणाबाबत चर्चा करणार

11/12/2019,9:46AM
, LIVE :  समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव , मंत्रिमंडळाची मंजुरी

गोपीनाथ गडावर जय्यत तयारी

बीड : गोपीनाथगड येथे होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू. गडावर सभामंडप आणि व्यासपीठाच्या कामाला सुरुवात, उद्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती, भाजपा नेते पंकजा मुंडे समर्थकांसोबत साधणार संवाद, भाजपाचे नाराज नेते सुद्धा उद्या उपस्थित राहणार

11/12/2019,9:46AM
, LIVE :  समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव , मंत्रिमंडळाची मंजुरी

पनवेलजवळ आठ फुटी अजगर

पनवेल : पनवेलमध्ये सापडला आठ फुटी अजगर, पनवेलमधल्या छोटा खांदा गावाजवळील रेल्वे लाईन जवळून हा अजगर जात होता, गावातील नागरिक नेहमीप्रमाणे रात्रीचं जेवण आटोपून नाईट वॉकला गेले असताना रेल्वे लाईनच्या बाजूने जाणारा हा अजगर दिसला. एखाद्या लोकलखाली हा अजगर येण्याअगोदर नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना आणि अग्निशमन दलाला दिली. मानवी वस्तीपासून काही अंतरावरच सापडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होत. काही तासांच्या प्रयत्नानंतर सुमारे आठ फूट लांबीचा अजगर पकडण्यात यश आले आणि नतंर पनवेल जवळील सुरक्षित अधिवासात जंगल भागात अजगराला सोडून देण्यात आले.

11/12/2019,9:45AM

, LIVE :  समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव , मंत्रिमंडळाची मंजुरी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *