साहेब, मलाही मुलीसारखं सांभाळून घ्या… रोहिणी खडसे यांचं शरद पवार यांना साकडं

एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी प्रवेशाआधीच भाजपच्या उमेदवाराचा प्रचारही सुरू केला आहे. मात्र, त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी शरद पवार गटातच राहायचा निर्णय घेतला आहे. मलाही तुमच्या मुलीसारखं सांभाळून घ्या, असं आवाहनच रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांना केलं आहे. रावेर येथील जाहीरसभेत त्या बोलत होत्या.

साहेब, मलाही मुलीसारखं सांभाळून घ्या... रोहिणी खडसे यांचं शरद पवार यांना साकडं
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 11:56 AM

माझे वडील भाजपमध्ये गेले तरी मला पक्षात थांबायचं आहे. तुमचा आदेश आणि सूचना असेल तर आपल्याच पक्षात थांबण्याची माझी इच्छा आहे. कारण मला या पक्षाची विचारधारा आवडते. पक्षाचं नेतृत्व आवडतं आणि नेतृत्वात असलेली जिद्द आवडते. आमच्या वाईट काळात आपण आम्हाला साथ दिली. ते आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. म्हणूनच मला या पक्षात थांबायचं आहे. सुप्रिया सुळे जशी तुमची कन्या आहे. तसंच मलाही मुलगी समजून सांभाळून घ्या. सुप्रिया यांच्यासारखंच माझ्यावरही प्रेम करा, असं आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना केलं.

रावेर लोकसभेच्या पक्षाच्या उमेदवाराला लीड देण्याचं काम मी करेल. तुतारी चिन्हाला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणायचं आहे. आपले उमेदवार संसदेत पाठवायचे आहेत. पवार साहेबांनी राज्यातील वातावरण फिरवलं आहे. त्यामुळे विजय आपलाच होणार आहे, असं सांगतानाच जिल्हा बँकेत कर्जासाठी शेतकऱ्यांना वणवण फिरावं लागत आहे, त्यांनाही न्याय द्यायचा आहे, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.

उमेदवारी जाहीर

दरम्यान, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी रोहिणी खडसे यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मला आठवतं नाथाभाऊ खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी पवार साहेबांच्या समोर रोहिणी यांनी सांगितलं की, नाथाभाऊंना कुठे जायचं तिकडे जाऊ दे, पण पवार साहेब मी तुमच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहे. काही झालं तरी मी तुमच्यासाठी काम करणार आहे. वडिलांनी वेगळा निर्णय घेतलेला असताना मुलीने वेगळा निर्णय घेणे हे सोप्पं काम नाही. पण रोहिणीताईंनी तो निर्धार केला. पवार साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिले आहेत. या विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्या उमेदवाराला तुम्ही लीड द्याल यात शंका नाही. पण उद्याच्या विधानसभेला देखील रोहिणीताई या आपल्या पक्षाच्या उमेदवार म्हणून इथे उभा राहणार आहेत. त्यांच्या मागे देखील तुम्हाला सगळ्यांना ताकदीन उभे राहावे लागेल, असं जयंत पाटील म्हणाले.

ही स्वाभिमानाची लढाई

यावेळी जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. आताची लढाई नेहमीसारखी नाहीये. ही लढाई लोकशाही वाचवण्याची आहे. संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. महाराष्ट्राच्या रक्षणासाठीची ही लढाई आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे. दिल्लीच्या समोर महाराष्ट्र कधी झुकत नाही. शिवाजी महाराजांनी दिलेला आदर्श टिकवण्यासाठी महाराष्ट्रात काही प्रमुख नेत्यांनी कंबर कसली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्रापुढे न झुकण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्याचा निर्धार केला आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्राचं चित्र बदलेल

महाविकास आघाडीचे यावेळी जास्तीत जास्त खासदार निवडून येणार आहे. यावेळी महाराष्ट्राचं चित्र बदलेल. ठाकरे आणि पवारांनी त्यांचा अश्वमेध अडवला आहे. त्यामुळे त्यांना मुलाखती द्याव्या लागत आहेत, असा टोला पाटील यांनी भाजपला लगावला.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.