Mahajyoti Exam: आणखी एका परीक्षेत मोठा गोंधळ, महाज्योतीची परीक्षा रद्द, कॉम्प्युटरच नसल्याने…

Mahajyoti Exam: महाज्योतीची आज परीक्षा पार पडत होती. मात्र परीक्षा केंद्रावर कंप्यूटर उपलब्ध नसल्याने परिक्षा रद्द करण्यात आली आहे.

Mahajyoti Exam: आणखी एका परीक्षेत मोठा गोंधळ, महाज्योतीची परीक्षा रद्द, कॉम्प्युटरच नसल्याने...
Mahajyoti
Image Credit source: tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Oct 07, 2026 | 12:28 PM

गेल्या काही दिवसांपासून देशातील वेगवेगळ्या भागात परीक्षावंरुन गोंधळ सुरु आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी तर संपूर्ण देशात आंदोलने करण्यात आली. त्यानंतर आता महाज्योती परीक्षेवरुन आज पुन्हा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थीनी परीक्षा केंद्रावर पोहोचल्या होत्या. मात्र, केंद्रावर कंप्यूटर उपलब्ध नसल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महाज्योतीची स्कॉलरशिपची आज परीक्षा पार पडणार होती. मात्र पुण्यातील आंबेगाव बुद्रक येथील सण ब्राईट स्कूल या परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला. परीक्षा केंद्रावर कंप्यूटर उपलब्ध नसल्याच्या दावा मुलींनी केला आहे. परीक्षेची वेळ 9 ते 11 अशी असतानाही अद्याप मुली परीक्षा केंद्र बाहेर उभ्या आहेत. अद्याप परीक्षा देण्याची संधी त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

Loading...

परिक्षा करण्यात आली रद्द

सकाळ पासून मुली विना अन्न पाण्याच्या परीक्षा केंद्र बाहेर उभ्या होत्या. मात्र अद्याप कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क केलेला नाही. परीक्षार्थी विद्यार्थिनींनी विचारणा केली असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात होती. – त्यामुळे या विद्यार्थिनींनी परीक्षा केंद्राच्या ढिसाळ कारभाराविरोधात संताप व्यक्त करत आहेत. त्यानंतर अधिकाऱ्यांनी परीक्षा रद्द केल्याची माहिती दिली.

रोहित पवारांनी व्यक्त केला संताप

महाज्योतीची स्कॉलरशिप परिक्षेचा गोंधळ पाहून आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘महाज्योती संदर्भात अतुल सावे यांचा राजीनामा घ्यायचा का ? मागणी केली तर घ्यायचा का असच घ्यायचा ? महाज्योतीचे विद्यार्थी इथे आले आणि त्यांनी सांगितलं. तर अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी करू. मंत्री अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार’, असे रोहित पवार म्हणाले.

300 कोटींचा घोटाळा?

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) येथे कौशल्या विकास प्रशिक्षणाच्या नावाखाली 300 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता. निविदा न काढता 300 कोटींची कामे दिल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच 51 टक्के खासगी भागीदारी असूनही सरकारी असल्याचा आभास, बोगस विद्यार्थी व बनावट प्लेसमेंटद्वारे निधी उचलला आणि प्रशिक्षण प्रक्रियेत पादर्शकतेचा आभाव असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्य समितीने केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us