AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 दिवसांपूर्वी बोहल्यावर चढले, दुचाकी घेऊन घराबाहेर पडले पण तेवढ्यात… पाटणमधील जोडप्याच्या मृत्यूने महाराष्ट्र हळहळला

महाराष्ट्रात अपघातांची भीषण मालिका सुरूच आहे. पाटणमध्ये नवदाम्पत्याचा अंत, वाशिममध्ये एसटी आणि ट्रकची समोरासमोर धडक, तर कोकण हायवेवर टायर फुटल्याने डंपर पलटी झाला. वाचा या सर्व घटनांचा सविस्तर आढावा.

10 दिवसांपूर्वी बोहल्यावर चढले, दुचाकी घेऊन घराबाहेर पडले पण तेवढ्यात... पाटणमधील जोडप्याच्या मृत्यूने महाराष्ट्र हळहळला
satara accident
| Updated on: Apr 21, 2026 | 10:50 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. त्यातच आता गेल्या काही तासांत राज्याच्या विविध भागात झालेल्या भीषण रस्ते अपघातांनी महाराष्ट्र हादरला आहे. कुठे ओव्हरटेकिंग, तर कुठे तांत्रिक बिघाडामुळे अनेक कुटुंबावर अनर्थ ओढवला. या अपघातांमध्ये एका नवदाम्पत्याने आपला जीव गमावला आहे, तर काही जण जखमी झाले असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत.

सुखी संसाराचे स्वप्न १० दिवसांतच अधुरे

साताऱ्यातील कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर एक अत्यंत विदारक घटना घडली. पाटण तालुक्यातील सडादाढोली येथील राजू झोरे (२५) आणि राणी झोरे (२३) या जोडप्याचे लग्न अवघ्या १० दिवसांपूर्वी झाले होते. घरगुती कामासाठी ते आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यावेळी येरफळे गावच्या हद्दीत त्यांनी एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप गाडीने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, राजू आणि राणी या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ऐन आनंदाच्या वातावरणात झोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पाटण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लेहणी-धोडप मार्गावर राज्य परिवहन मंडळाची बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. दोन्ही वाहने वेगात असल्याने धडक होताच प्रवाशांमध्ये मोठी पळापळ झाली. या अपघातात बस चालक आणि ट्रक चालक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तसेच बसमधील १५ ते १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला

नाशिकच्या गिरणार–दुगाव रोडवर सकाळी एका अज्ञात पिकअप वाहनाने वाळू गणपत थेटे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. वाळू थेटे हे सकाळी मारुती रायांच्या दर्शनासाठी मंदिरात जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. धडक दिल्यानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला. थेटे यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने फरार चालकाचा शोध घेत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटल्याने थरार

मुंबई गोवा महामार्गावर टायर फुटल्याने अपघात घडला. गोव्याच्या दिशेने खडी घेऊन जाणाऱ्या डंपरचा टायर झाराप पत्रादेवी बायपासवर अचानक फुटला. टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. यावेळी डंपर थेट दुभाजक (डिवायडर) तोडून महामार्गावर पलटी झाला. या अपघातात चालक थोडक्यात बचावला, मात्र डंपरमधील सर्व खडी रस्त्यावर पसरल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य करत चालकाला बाहेर काढले. तसेच जेसीबीच्या साहाय्याने खडी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...