Maharashtra News LIVE Update | वसईत सेवा निवृत्त ग्रंथपालला 25 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक

| Updated on: Sep 24, 2021 | 1:45 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | वसईत सेवा निवृत्त ग्रंथपालला 25 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Sep 2021 10:06 PM (IST)

    वसईत सेवा निवृत्त ग्रंथपालला 25 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक

    सेवा निवृत्त ग्रंथपालला 25 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक

    वसईच्या उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयातून सावकारी परवाना मिळवून देण्यासाठी केली होती पैशांची मागणी

    गंगाराम जयराम जाधव (वय 70) असे रंगेहाथ अटक केलेल्या इसमाचे नाव

    अँटी करप्शन ब्युरो ठाणे, कॅम्प पालघरच्या युनिटने केली कारवाई

  • 23 Sep 2021 09:00 PM (IST)

    जालन्यात मोठी दुर्घटना, पुलावरुन जाताना बस नदीत कोसळली

    जालना : परतूर आष्टी रोडवर श्रीष्टी येथील कसुरा नदीत पुलावरून पाणी वाहत असताना बस पुलावरून जातांना नदीत कोसळली. याच नदीत दुपारी एक तरुण वाहून गेला होता. पोहता येत असल्याने तो तरुण वाचला होता. आता याच पुलावरून प्रवाशाने भरलेली बस नदीत कोसळली. स्थानिक नागरिक सध्या या बस मधील प्रवाशांना बसमधून काढत आहेत. अंधार असल्याने मदत कार्यात अडचणी येत असली तरी या घटनेच्या ठिकाणी पोलीस आणि नागरीक प्रवाशांना काढण्याचे काम करत आहेत

  • 23 Sep 2021 07:50 PM (IST)

    आरोग्य विभागाच्या भरतीतला गोंधळ मिटता मिटेना, भरती आरोग्य विभागाची महाराष्ट्रात आणि विद्यार्थ्यांला परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशात

    आरोग्य विभागाच्या भरतीतला गोंधळ मिटता मिटेना

    भरती आरोग्य विभागाची महाराष्ट्रात आणि विद्यार्थ्यांला परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशात

    26 तारखेला आरोग्य विभागाची गट क आणि ड ची होतीये परीक्षा

    दत्ता पतुरकर या विद्यार्थ्यांला परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशचं

    परीक्षेआधी नियोजन करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

  • 23 Sep 2021 07:21 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 171 नवे कोरोनाबाधित, 8 जणांचा मृत्यू

    पुणे : दिवसभरात १७१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात १०५ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०६. - १८१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९९९५९. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १६३७. - एकूण मृत्यू -९०११. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८९३११. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८०३२.

  • 23 Sep 2021 07:06 PM (IST)

    आठ वर्षीय मुलीवर ट्यूशन टिचरकडून लैंगिक अत्याचार, कल्याणमधील संतापजनक घटना

    कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

    एका आठ वर्षीय मुलीवर ट्यूशन टिचरने केला लैंगिक अत्याचार

    टय़ूशन टिचर मुदर तालवाला याला बाजारपेठ पोलिसांनी केली अटक

    दीड महिन्यांपासून मुदर करीत होता अत्याचार

    मुदरची पत्नी माहेरी गेली असता मुदर घेत होता मुलीची ट्यूशन

  • 23 Sep 2021 07:05 PM (IST)

    कोर्टाची परवानगी न घेता शिर्डी संस्थान नुतन विश्वस्त मंडळाने पदभार स्वीकारला, औरंगाबाद हायकोर्टात तक्रार

    शिर्डी संस्थान नुतन विश्वस्त मंडळ नेमणूक कोर्टाची परवानगी न घेता स्विकारलाय पदभार पुढच्या सुनावणीपर्यंत निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार नाही औरंगाबाद हायकोर्टाचे आदेश नविन राजकीय विश्वस्त मंडळाची सरकारने केलीय नियुक्ती विश्वस्त मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नाही पुढील सुनावणी होणार 4 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने विश्वस्त मंडळ नियुक्ती संदर्भात उत्तर देण्यासाठी मागितली मुदत

  • 23 Sep 2021 05:25 PM (IST)

    किशोरी पेडणेकर बोरीवली पोलीस ठाण्यात, भाजप पदाधिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप

    मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बोरीवली पोलीस ठाण्यात दाखल, बोरीवलीत भाजप पदाधिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप

    किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया :

    पोलिसांनी कृती केलेली आहे. वस्तुस्थितीला धरुन त्यांनी नोंद केली आहे. फिर्यादीने सांगितलेली सर्व माहिती नोंद केली आहे. कोर्टात त्यांनी तपासाबाबत मागणी केली आहे. आरोपी आणि तक्रारदार यांचा सगळ्यांचा वस्तुनिष्ठ रिपोर्ट बनवला आहे. तो रिपोर्ट आम्ही सगळ्यांनी वाचला आहे. पोलिसांनी कुठेही कुचराई केलेली नाही. पीडिता एक वर्ष का थांबली? असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यावर पीडितेनं उत्तर दिलं आहे. या घटनेत कोणतंही राजकारण असू नये. महिला आपल्याकडे न्याय मागायला येते तेव्हा त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जावं. मुंबईचे पोलीस तप्तरतेने काम करतात. कायदा, पोलीस, सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी महत्त्वाच्या असतात. महिलेवर अत्याचार होतात तर आपण न्यायासाठी उभं राहिलं पाहिजे.

  • 23 Sep 2021 05:12 PM (IST)

    डोंबिवलीतील बलात्काराची घटना अतिशय धक्कादायक : देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया :

    डोंबिवलीतील बलात्काराची घटना अतिशय धक्कादायक, सातत्याने वाढत्या घटनेची चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे डोंबिवली सारख्या भागात अशाप्रकारची घटना घडने चिंतेची बाब आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ लक्ष घालावे, अशी आमची मागणी आहे.

    ओबीसी आरक्षणा संदर्भात जो पहिला अध्यादेश पाठवला असता तो कोर्टात मंजूर झाला नसता. त्यामुळे राज्यपालांनी त्यातील ऋटी दाखवून दिली. त्यानंतर सुधारीत अध्यादेश राज्य सरकारने पाठवला. तो अध्यादेश राज्यपालांनी मंजूर केलाय.

    एम्पेरिकल डेटा नाही तर तो सेन्सस डेटा आहे. एम्पेरिकल डेटा संदर्भात मागच्या बैठकीतच मुख्यमंत्र्यांसमोरच खुलासा झाला आहे. त्यामुळेच अशाप्रकारचा अध्यादेश सरकारने काढला आहे. तसेच केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात वेळ मागितलेली नाही. राज्य सरकारने चार दिवसांचा वेळ मागितला आहे.

    बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी आज माझी भेट घेतली. त्यांनी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती केली. मी त्यांना प्रदेशाध्यक्ष, आमची कोअर कमिटीसोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ, असं सांगितलं. १२ आमदारांचा विषय नाही. भाजप सौदेबाजी करत नाही. काही पत्रकारांना पतंग उडवायची सवय झाली आहे. त्यांनी उडवलेल्या या पतंगी आहेत. आमचे १२ आमदार जे सस्पेंड केले आहेत ते नियमबाह्य आहे. आम्ही त्या संदर्भात कोर्टात गेलो. आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत. सौदेबाजी करणारे लोकं नाहीत

  • 23 Sep 2021 04:42 PM (IST)

    ओबीसी आरक्षणाबाबत मोठी बातमी, राज्य सरकारच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

    ओबीसीच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी, राज्य सरकारने पाठवलेल्या सुधारीत अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची स्वाक्षरी

  • 23 Sep 2021 04:40 PM (IST)

    इम्पेरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारचा नकार : छगन भुजबळ

    अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    इम्पेरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारचा नकार केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात अॅफेडिव्हेट ओबीसींची जनगणना करण कठीण केंद्र सरकारची कोर्टात माहिती जाती खूप आहेत, असं केंद्र सरकार अॅफेडिव्हेटमध्ये म्हणाले

    सुप्रीम कोर्टात आमची लढाई सुरुत राहील

  • 23 Sep 2021 04:03 PM (IST)

    महापालिका निवडणुकीत 3 ऐवजी 2 प्रभाग असावा, ठाकरे सरकारविरोधात काँग्रेसने दंड थोपटले

    ठाकरे सरकारविरोधात काँग्रेसने दंड थोपटले, काँग्रेसने एकमताने ठराव मंजूर केला, या ठरावत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाला आव्हान, महापालिका निवडणुकीत 3 ऐवजी 2 प्रभाग असावा, असा ठराव मंजूर, काँग्रेस याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवणार

  • 23 Sep 2021 02:04 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील रंगकर्मी आक्रमक, राज्यातील नाट्यगृहे सुरु करण्याच्या मागणीसाठी मंत्रालया समोर आंदोलनाची घोषणा

    कोल्हापूर :

    कोल्हापूर जिल्ह्यातील रंगकर्मी आक्रमक

    राज्यातील नाट्यगृहे सुरु करा या मागणीसाठी मंत्रालया समोर आंदोलनाची घोषणा

    मंत्रालयासमोर रंगकर्मी भरवणार सांस्कृतिक कलाबाजार

    29 सप्टेंबर रोजी मंत्रालय आणि सह्याद्री अतिथीगृह समोर कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो रंगकर्मी होणार सांस्कृतिक कला बाजारात सहभागी

    वारंवार निवेदने देऊनही राजकीय पक्षाच्या लोकांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कलाकारांचं पाऊल

    येणाऱ्या सर्व निवडणुकात कोल्हापूरचे रंगकर्मी टाकणार बहिष्कार

    सुमारे 10 हजारपेक्षा अधिक रंगकर्मींचा निवडणुकीवर ती बहिष्कार

    रंगकर्मी कोल्हापूरचे अध्यक्ष प्रसाद जमदग्नी यांची माहिती

  • 23 Sep 2021 02:02 PM (IST)

    राज ठाकरे यांच्याकडून मनसेत मोठे फेरबदल

    नाशिक - राज ठाकरे यांच्याकडून मनसेत मोठे फेरबदल..

    दिलीप दातीर यांची मनसे नाशिक शहराध्यक्ष पदी नियुक्ती

    तर अंकुश पवार आणि रातनकुमार इचम यांना जिल्हाध्यक्षपद..

    आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज ठाकरे यांचे पक्षात मोठे बदल

  • 23 Sep 2021 12:14 PM (IST)

    डोंबिवलीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गँगरेप, 22 जण ताब्यात

    डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

    भोपर परिसरातील घटना

    14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गँगरेप

    गँगरेप मध्ये 31 आरोपी ,22 जणांना मानपाडा पोलिसांनी घेतलं ताब्यात

    अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करत काढला होता व्हिडियो

    या व्हिडियोच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी केला होता बलात्कार

  • 23 Sep 2021 12:12 PM (IST)

    पारनेर तालुक्यातील क्रांती शुगर साखर कारखान्याची पाहणी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या थोड्याच वेळात दाखल होणार

    अहमदनगर

    पारनेर तालुक्यातील क्रांती शुगर साखर कारखान्याची पाहणी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या थोड्याच वेळात दाखल होणार

    सोमय्या हे कारखान्याची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार

    तर राज्यातील संशयस्पद विक्री व्यवहार झालेल्याच्या आरोपांच्या यादीत पारनेरच्या साखर कारखान्याचाही समावेश

    पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी खासदार विदुरा नवले यांच्या अधिपत्याखालील क्रांती शुगर या कंपनीने पारनेरचा कारखाना विकत घेतला

    त्यांना राज्यातील बड्या नेत्यांचे पाठबळ असल्याचाही आरोप

  • 23 Sep 2021 11:28 AM (IST)

    आगामी नागपूर मनपा निवडणुकीत भाजप 25 के 30 टक्के उमेदवार बदलणार

    नागपूर -

    - आगामी नागपूर मनपा निवडणुकीत भाजप 25 के 30 टक्के उमेदवार बदलणार

    - समाधानकारक कामगीरी नसणाऱ्या नगरसेवकांना भाजप वगळणार

    - तीन च्या प्रभाग पद्धतीचं स्वागत करताना, नागपूर भाजपचा मोठा निर्णय

    - अनेक भाजप नगरसेवकांची धाकधूक वाढली

    - भाजपचे मनपाते सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांची माहिती

    - आगामी महानगरपालिका निवडणूक जिंकण्याचा

  • 23 Sep 2021 10:56 AM (IST)

    जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने होतेय वाढ

    औरंगाबाद -

    जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने होतेय वाढ

    नाशिकच्या धरण समूहातून जायकवाडीत मोठा विसर्ग सुरू

    जायकवाडी धरणातील पाणीसाठा गेला 75 टक्क्यांच्या वर

    जायकवाडी धरण यावर्षीदेखील भरणार पूर्णक्षमतेने भरण्याची शक्यता..

    या वर्षीच्या जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणामध्ये पाणीसाठा जमा..

  • 23 Sep 2021 10:55 AM (IST)

    गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून पाणी सोडल्यामुळे झाली वाढ

    औरंगाबाद -

    गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ

    नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून पाणी सोडल्यामुळे झाली वाढ

    गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले

    गोदावरीतील पाणी जायकवाडी धरणात पोचण्यासाठी लागणार आणखी 18 तास

    सध्या पाणी डोणगाव सावखेड गंगा गावापर्यंत पोचले

  • 23 Sep 2021 10:54 AM (IST)

    ठाणे ते नाशिक आणि घोडबंदर ते नाशिक या महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी

    ठाणे ते नाशिक आणि घोडबंदर ते नाशिक या महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी

    10 ते 15 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा

    खड्यांमुळे वाहतूक कोंडीचा फटका वाहनधारकांना

    नाशिक ते ठाणे येथे येणारा मार्ग मात्र मोकळा

    या वाहतूक कोंडी मुळे अत्यावश्यक सेवेतील असणाऱ्या रुग्ण वाहिका आणि इतर वाहनांना याचा मोठ्या प्रमाणात फटका

    वारंवार रस्त्याचे काम करून देखील पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे

  • 23 Sep 2021 10:54 AM (IST)

    मनसे विरोधात नाशिक पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडये आक्रमक

    नाशिक - मनसे विरोधात पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडये आक्रमक

    कायद्याचं उल्लंघन केल्यास पक्षाची तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे करणार..

    पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना याबाबत जाब विचारणार आहे

    समाधानकारक उत्तर न मिळाल्यास थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

    कायदा सगळ्या पक्षांसाठी समान

    कायद्याचं उल्लंघन केल्यास कारवाईला समोर जावं लागेल

    पोलीस आयुक्तांच्या भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापलं.

  • 23 Sep 2021 09:43 AM (IST)

    नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडये राज ठाकरे यांच्या भेटीला

    नाशिक - पोलीस आयुक्त दीपक पांडये राज ठाकरे यांच्या भेटीला

    मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काल झाली होती बाचाबाची

    पोलीस आयुक्त राज ठाकरे यांना भेटण्यासाठी हॉटेल ssk वर दाखल

    पोलीस आयुक्त आणि राज ठाकरे यांच्यात काय चर्चा होणार याकडे लक्ष

  • 23 Sep 2021 09:34 AM (IST)

    पुण्यातील समाविष्ट 11 गावांसाठी मुळशी धरणातून पाणी द्या

    पुणे

    पुण्यातील समाविष्ट 11 गावांसाठी मुळशी धरणातून पाणी द्या

    महापालिकेचा जलसंपदा विभागाला प्रस्ताव,

    मुळशी धरणातून 5 टीएमसी पाण्याची जलसंपदा विभागाकडे मागणी,

    महापालिकेच्या मुख्य सभेत ठराव मंजूर करून प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे,

    पुण्याला समाविष्ट 11 गावांसाठी 5 टीएमसी पाणी मिळणार का ? याकडे सगळ्यांच लक्ष,

    अतिरिक्त पाणी देण्यास जलसंपदा विभाग करतंय टाळाटाळ

  • 23 Sep 2021 08:21 AM (IST)

    नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरवर हल्ला करुन शिवीगाळ करणाऱ्याला अटक

    नागपूर -

    नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरवर हल्ला करुन शिवीगाळ करणाऱ्याला अटक

    रुग्णांचे नातेवाईक आणि डाक्टर यांच्यात झाला होता वाद

    डॉक्टर च्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करून केली अटक

  • 23 Sep 2021 08:21 AM (IST)

    दुचाकी चोरणारा कुख्यात चोर चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात

    चंद्रपूर -  दुचाकी चोरणारा कुख्यात चोर चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात

    चंद्रपूर शहर येथील एकूण ४ गुन्हे पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे दाखल असून

    रसुल शेख वय ३७ राहणार घुटकाळा चौक चंद्रपुर यांला संशयावरून विचारपुस केली असता आरोपीने

    एकूण ५ दुचाकी मोटारसायकल चोरून नेल्याची कबुली दिली

    त्याचेकडून एकूण 5 दुचाकी वाहना सह एकूण २,२०,०००/- रु. चा माल आरोपीचे ताब्यातुन हस्तगत करण्यात आला आहे

  • 23 Sep 2021 07:58 AM (IST)

    पुणे शहर आणि ग्रामीण भागातील तब्बल 20 हजार 627 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण अपूर्ण

    पुणे

    पुणे शहर आणि ग्रामीण भागातील तब्बल 20 हजार 627 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण अपूर्ण

    शासकीय शिक्षक- शिक्षकेतर कर्मचा-यांचे 85 टक्के लसीकरण पूर्ण

    परंतु खाजगी शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी लसीकरणाकड फिरवली पाठ

  • 23 Sep 2021 07:57 AM (IST)

    स्वारगेट ते काजत्र भुयारी मेट्रो प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला महापालिकेच्या मुख्य सभेची अखेर मंजुरी

    पुणे

    स्वारगेट ते काजत्र भुयारी मेट्रो प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला महापालिकेच्या मुख्य सभेची अखेर मंजुरी

    यामुळे स्वारगेट ते कात्रजच्या मेट्रोचा मार्ग मोकळा

    स्वारगेट- कात्रज भुयारी मेट्रो मार्ग हा ५.४३ किलोमीटर लांबीचा

    यासाठी ४ हजार २० कोटी खर्च येणार असून जुलै २०२७ पर्यत या कामाची मुदत आहे

  • 23 Sep 2021 07:56 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ

    - नागपूर जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ

    - २४ तासांत १६ नव्या कोरोना रुग्णांची भर

    - जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या पुन्हा शंभरीकडे

    - कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली

  • 23 Sep 2021 07:56 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरात आज फक्त ‘कोव्हॅक्सिन’चे होणार लसीकरण

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवड शहरात आज फक्त ‘कोव्हॅक्सिन’चे होणार लसीकरण

    -कोविशील्ड लसीचा साठा उपलब्ध नसल्याने आज कोविशील्डचे लसीकरण करण्यात येणार नाही

    - शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना आज ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे

    -ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे

  • 23 Sep 2021 07:56 AM (IST)

    नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूक

    - नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूक

    - जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी १०० उमेदवारांचे अर्ज वैध

    - पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी १५६ उमेदवारांचे अर्ज वैध

    - २७ सप्टेंबरला तीन नंतर उमेदवारांची अंतिम यादी

    - सहा लाख १६ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

    - पाच ॲाक्टोबरला सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० मतदान

  • 23 Sep 2021 07:55 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमधून संत तुकारामनगर जवळ एसटीबस स्थानकाकडे जाणाऱ्या अंडरपास मधे खड्ड्यांचे साम्राज्य

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवडमधून संत तुकारामनगर जवळ एसटीबस स्थानकाकडे जाणाऱ्या अंडरपास मधे खड्ड्यांचे साम्राज्य

    -त्यामुळे वाहनचालक आणि नागरिक हैराण

    -ह्या खड्यांमुळे अपघात होत असतात

    -हे खड्डे लवकर व्यवस्थित करण्याची मागणी ते करत आहेत

  • 23 Sep 2021 07:55 AM (IST)

    नागपुरात ‘नीट’ परिक्षेचा महाघोटाळा, परिक्षेत डमी उमेदवार

    - नागपुरात ‘नीट’ परिक्षेचा महाघोटाळा, परिक्षेत डमी उमेदवार

    - आर के एज्युकेशनच्या परिमल कोतपल्लीवार विरोधात गुन्हा दाखल

    - सीबीआयने केला गुन्हा दाखल, पाच जणांना अटक

    - ५० लाखांच्या बदल्यात मेडीकल प्रवेशाचे आमिष

    - CBI ने काही दिवसांपूर्वी पाच कोचिंग क्लासेसवर धाड टाकली होती

    - शहरातील आणखी काही कोचिंग क्लासेस सीबीआयच्या रडारवर

  • 23 Sep 2021 07:54 AM (IST)

    नागपूर विद्यापीठाची बी.ई. ची पदवी आता होणार इतिहास जमा

    - नागपूर विद्यापीठाची बी.ई. ची पदवी आता होणार इतिहास जमा

    - नागपूर विद्यापीठात आता मिळणार बी.टेक. ची पदवी

    - बी.ई. ऐवजी बी.टेक. ची पदवी देण्याचा नागपूर विद्यापीठाचा निर्णय

    - याबाबत नागपूर विद्यापीठाने जारी केली अधिसुचना

    - अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मिळणार बी.टेक. ची पदवी

    - विद्यापीठाने २०२०-२१ च्या सत्रापासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचं स्वरुप बदललं

  • 23 Sep 2021 07:54 AM (IST)

    किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा पुन्हा एकदा गाजणार

    कोल्हापूर

    किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा पुन्हा एकदा गाजणार

    मुरगूड नगरपालिकेने केला सोमय्यांच्या प्रवेश बंदीचा ठराव

    मुरगूड शहरात सोमय्या यांना कायमच्या प्रवेश बंदीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर

    व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली विशेष सर्वसाधारण सभा

    मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर असलेले किरीट सोमय्या मुश्रीफांनी विरोधात तक्रार देण्यासाठी मुरगुड पोलीस ठाण्यात जाण्याच्या आहेत तयारीत

    सोमय्यांचा नियोजित दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचा ठराव

  • 23 Sep 2021 07:54 AM (IST)

    सोलापूर महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने घेण्याचा महाविकास आघाडी सरकारने घेतला निर्णय

    सोलापूर महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने घेण्याचा महाविकास आघाडी सरकारने घेतला निर्णय

    त्यामुळे आता एका प्रभागात तीन नगरसेवक राहणार

    आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचे अनेकांचे मनसुबे उधळले

    या प्रक्रियेत अपेक्षा ऐवजी पक्षाचेच वर्चस्व राहणार

    राजकीय सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शिरण्याचा स्वागत

    राज्य निवडणूक आयोगाने 25 ऑगस्ट प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे दिले होते आदेश

    त्यामुळे एक वॉर्ड एक नगरसेवक पद्धतीने निवडणुका होतील असा होता अंदाज

    मात्र सरकारने बहुसदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला नाही आता एका प्रभागात राहणार तीन नगरसेवक

  • 23 Sep 2021 07:53 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात ओल्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात

    - नागपूर जिल्ह्यात ओल्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात

    - हातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीक गेल्याने मोठं नुकसान

    - ‘पंचनामे नंतर करा आधी हेक्टरी २५ हजारांची मदत द्या’

    - उमरेडचे काँग्रेस आ. राजू पारवे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    - शेतकरी मरणाच्या दारात असताना, पंचनाम्यांच्या सोपस्काराआधी मदतीची मागणी

    - आ. राजू पारवे यांनी केली ओल्या दुष्काळाची पाहणी

    - सोयाबीन गेल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

  • 23 Sep 2021 07:53 AM (IST)

    कोल्हापूरहून कर्नाटकसह गोव्याला जाणारी एसटी सेवा पुढचे काही काळ राहणार बंदच

    कोल्हापूर

    कर्नाटकसह गोव्याला जाणारी एसटी सेवा पुढचे काही काळ राहणार बंदच

    एसटी सेवा पूर्ववत करण्यासाठी कोल्हापूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली विनंती दोन्ही राज्यांनी धुडकावली

    Rt-pcr चाचणी बंधनकारक असल्याने प्रतिसाद असूनही एसटी सेवा करावी लागलीय बंद

    नियम पाळून एसटी सेवा सुरु करण्याच्या प्रस्तावावर दोन्ही राज्यांची आडमुठी भूमिका

    सीमा भागातील प्रवाशांची ही होतेय कुचंबणा

Published On - Sep 23,2021 6:38 AM

Follow us
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.