AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे स्वत:च्या शिवसेनेत..रेजीम चेंज बद्दल बोलणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच सडेतोड प्रत्युत्तर

Devendra Fadnavis : रेजीम चेंज बद्दल बोलणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या देशात आंदोलनांचं सत्र सुरु आहे. दिल्लीतल्या आंदोलनात रेजीम चेंजबद्दल बोलणं सुरु झालय.

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे स्वत:च्या शिवसेनेत..रेजीम चेंज बद्दल बोलणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच सडेतोड प्रत्युत्तर
Uddhav Thackeray-Devendra Fadnavis
| Updated on: Oct 18, 2026 | 2:16 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत मागच्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलनं सुरु आहे. काँग्रेस, कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. हळूहळ आता या आंदोलनादरम्यान रेजीम चेंज विषयी भाष्य चालू झालं आहे. परवा अभिजीत दीपके यांच्या पत्रकार परिषदेत सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकिल प्रशांत भूषण हे रेजीम चेंजबद्दल जाहीरपणे बोलले. हो, आम्हाला सत्ता बदल हवाय असं ते म्हणाले. आता उद्धव ठाकरे सुद्धा हेच बोलले आहेत. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं.

“पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे स्वत: शिवसेनेत रेजीम चेंज रोखू शकले नाहीत. ते दुसऱ्या कुठल्या रेजीम चेंजबद्दल बोलतयात मला माहित नाही. जेव्हा त्यांच्या पक्षाने हिंदुत्व सोडलं, हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले तेव्हा अशी परिस्थिती आली की, ज्यांना बाळासाहेबांच्या विचारांवर चालायचं होतं, त्यांनी खरी शिवसेना बनवली” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले. “सर्वात मोठी गोष्ट ही आहे की, मी स्पष्टपणे सांगितलय की, संविधानाशी लढणं बंद करा. इथे निर्णय संसदेत होतील. संविधानाने होईल, रस्त्यावर निर्णय होणार नाही. लोकाशाहीत निर्णय निवडणुकीने होईल. मोदी सरकार आहे, पुन्हा निवडून येईल” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

इट्स डन ब्रो, सर्वकाही जाहीर झालय

प्रशांत भूषण यांच्या रेजीम चेंजच्या वक्तव्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला होता. “इट्स डन ब्रो, सर्वकाही जाहीर झालय. अखेर हे सर्वकाही सत्ता बदलासाठी आहे. शेवटी मनात होतं ते ओठांवर आलच” असं फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये आहेत. नागपूरमध्ये आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आले होते. तिथे येऊन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. सध्या देशातील राजकीय वातावरण तापलं आहे.

Follow Us
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा
प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96....
Chhatrapati Sambhajinagar : प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96 पैकी फक्त....
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीत शपथांचं राजकारण; शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक येतो.....
Gokul Elections : गोकुळ निवडणुकीत शपथांचं राजकारण; शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक येतो, के.पी. पाटील असं का म्हणाले?
अडीच महिन्यांनंतर महाराष्ट्रात पावसाची हजेरी; रत्नागिरी, चिपळूणसह.....
Rain Update : अडीच महिन्यांनंतर महाराष्ट्रात पावसाची हजेरी; रत्नागिरी, चिपळूणसह ह्या जिल्ह्यात बरसल्या पावसाच्या सरी
मंत्र्यांचे खिसे झटकले तरी....; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी जमा होतील; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात