Maharashtra Corona Update | कोरोनाबाधितांच्या संख्येत 5,257 रुग्णांची भर, आकडा 1 लाख 69 हजार 883 वर

राज्यात आज दिवसभरात 2 हजार 385 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत एकूण 88 हजार 960 रुग्ण बरे झाले आहेत.

Maharashtra Corona Update | कोरोनाबाधितांच्या संख्येत 5,257 रुग्णांची भर, आकडा 1 लाख 69 हजार 883 वर

मुंबई : राज्यात आज (29 जून) दिवसभरात तब्बल 5 हजार 257 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले (Maharashtra Corona Latest Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 69 हजार 883 वर पोहोचली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन, डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य यंत्रणा प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे (Maharashtra Corona Latest Update).

दिवसभरात 2 हजार 385 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात आज दिवसभरात 2 हजार 385 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण 88 हजार 960 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 52.37 टक्क्यांवर पोहोचलं आहे. सध्या राज्यात 73 हजार 298 रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनामुळे 7,610 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 181 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी 78 रुग्णांचा मृत्यू गेल्या 48 तासांमधील तर उर्वरित 103 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्याचा मृत्यूदर 4.48 टक्के इतका आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 7 हजार 610 रुग्णांचा मृत्यू झाला आहे (Maharashtra Corona Latest Update).

5 लाख 74 हजार 093 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात 5 लाख 74 हजार 093 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 37 हजार 758 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई94146656225335
पुणे (शहर+ग्रामीण)40180168571127
ठाणे (शहर+ग्रामीण)63778276421705
पालघर 100784967194
रायगड88654174164
रत्नागिरी88461030
सिंधुदुर्ग2622175
सातारा1780102868
सांगली66235018
नाशिक (शहर +ग्रामीण)73164209300
अहमदनगर (शहर+ग्रामीण)89455622
धुळे152386078
जळगाव 60303508353
नंदूरबार 27914911
सोलापूर43132161351
कोल्हापूर 122082220
औरंगाबाद84324304341
जालना108357147
हिंगोली 3422792
परभणी2141035
लातूर 71933635
उस्मानाबाद 39524617
बीड2351185
नांदेड 60625224
अकोला 1876149894
अमरावती 85864037
यवतमाळ 44829114
बुलडाणा 4121616
वाशिम 1951065
नागपूर2034138722
वर्धा 34141
भंडारा162891
गोंदिया 2161563
चंद्रपूर177980
गडचिरोली115711
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)202031
एकूण26092414450710482

Maharashtra Corona Latest Update

संबंधित बातम्या :

Aurangabad Unlock-2 | औरंगाबाद MIDC मध्ये 8 दिवसांचा कर्फ्यू, गरज पडल्यास शहरातही निर्णय

Lockdown | लॉकडाऊन वाढवल्यानंतर टप्प्याटप्याने शिथीलता, राज्यात काय सुरु, काय बंद?

Thane Lockdown Extension | ठाण्यात 2 जुलैपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *