Aurangabad Unlock-2 | औरंगाबाद MIDC मध्ये 8 दिवसांचा कर्फ्यू, गरज पडल्यास शहरातही निर्णय

औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी 8 दिवसांच्या कर्फ्यूची घोषणा केली आहे. औरंगाबाद एमआयडीसीतील नागरी वसाहतीत 8 दिवस कडकडीत बंद राहणार आहे.

Aurangabad Unlock-2 | औरंगाबाद MIDC मध्ये 8 दिवसांचा कर्फ्यू, गरज पडल्यास शहरातही निर्णय

औरंगाबाद : अनलॉक-2 मध्ये औरंगाबाद शहर (Aurangabad Unlock-2 Rules) आणि जिल्ह्याला वेगवेगळे नियम लागू असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादेतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिका आयुक्तांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद पालिका आयुक्त अस्तिकुमार पांडे, कलेक्टर उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली (Aurangabad Unlock-2 Rules).

औरंगाबाद एमआयडीसीत 8 दिवसांचा कर्फ्यू

औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी 8 दिवसांच्या कर्फ्यूची घोषणा केली आहे. औरंगाबाद एमआयडीसीतील नागरी वसाहतीत 8 दिवस कडकडीत बंद राहणार आहे. कोरोना नियंत्रणात आला नाही, तर औरंगाबाद शहरातही कर्फ्यू लावणार, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी-आयुक्तांच्या निर्णयानुसार शहर आणि जिल्ह्याला वेगवेगळे नियम लागू राहतील. ते नियम काय?

  • औरंगाबाद शहरातील दुकानं 9 ते 5 पर्यंत सुरु राहतील.
  • मॉल आणि मोठी मार्केट अजूनही बंद राहणार.
  • रेस्टॉरंट उघडण्यास बंदी, मात्र होम डिलिव्हरी सुरु राहणार.
  • दारुची दुकानं बंदच राहणार, होम डिलिव्हरी सुरु राहणार.
  • शैक्षणिक संस्थेत नॉन टिचिंग स्टाफ शाळेत येऊ शकेल, पण शाळा बंद राहतील.
  • स्पा सलून ब्युटी पार्लर सुरु राहतील, त्यांच्यावर निर्बंध आहेत.
  • एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पास बंधनकारक असेल.
  • वाळूज एमआयडीसी एरियात 4 तारखेपासून 12 जुलै पर्यंत पूर्ण कर्फ्यू असेल

Aurangabad Unlock-2 Rules

औरंगाबादेत कोरोनाचे  रुग्ण

औरंगाबादेत सध्या कोरोनाचे 4 हजार 833 रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 222 जणांनी कोरोनावर मात केली आहे. औरंगाबादेत आतापर्यंत 227 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Aurangabad Unlock-2 Rules

संंबंधित बातम्या :

Lockdown | लॉकडाऊन वाढवल्यानंतर टप्प्याटप्याने शिथीलता, राज्यात काय सुरु, काय बंद?

Maharashtra Lockdown Extension | महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला

Thane Lockdown Extension | ठाण्यात 2 जुलैपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *