Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,940 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 65 हजारांच्या पार

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 65 हजार 168 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 99 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,940 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 65 हजारांच्या पार

मुंबई : राज्यात आज 2 हजार 940 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली (Maharashtra Corona Virus Latest Update) आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 65 हजार 168 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 99 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच, दिवसभरात 1 हजार 084 जण कोरोनामुक्त (Maharashtra Corona Virus Latest Update) झाले आहेत.

राज्यात सध्या 34 हजार 881 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आज 99 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या 2197 इतकी झाली आहे.

आज झालेल्या 99 मृत्यूपैकी कुठे किती मृत्यू?

  • मुंबईचे – 54
  • वसई-विरार – 7
  • नवी मुंबई – 2
  • रायगड – 3
  • पनवेल – 7
  • ठाणे – 6
  • कल्याण-डोंबिवली – 2
  • जळगाव – 3
  • सोलापूरचे – 6
  • पुणे – 6
  • नागपूर – 1
  • इतर राज्ये – 2

Maharashtra Corona Virus Latest Update

राज्यातील रुग्ण दुपटीचा वेग 17 दिवसांवर

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11.3 दिवस होता, तो आता 17.5 दिवस झाला आहे. तर देशाचा रुग्ण दुपटीचा वेग 17.1 दिवस इतका झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 43.07 टक्क्यांवर गेले आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.37 टक्क्यांवर आला आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 660 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 35 हजार 420 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई94146656225335
पुणे (शहर+ग्रामीण)40180168571127
ठाणे (शहर+ग्रामीण)63778276421705
पालघर 100784967194
रायगड88654174164
रत्नागिरी88461030
सिंधुदुर्ग2622175
सातारा1780102868
सांगली66235018
नाशिक (शहर +ग्रामीण)73164209300
अहमदनगर (शहर+ग्रामीण)89455622
धुळे152386078
जळगाव 60303508353
नंदूरबार 27914911
सोलापूर43132161351
कोल्हापूर 122082220
औरंगाबाद84324304341
जालना108357147
हिंगोली 3422792
परभणी2141035
लातूर 71933635
उस्मानाबाद 39524617
बीड2351185
नांदेड 60625224
अकोला 1876149894
अमरावती 85864037
यवतमाळ 44829114
बुलडाणा 4121616
वाशिम 1951065
नागपूर2034138722
वर्धा 34141
भंडारा162891
गोंदिया 2161563
चंद्रपूर177980
गडचिरोली115711
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)202031
एकूण26092414450710482

Maharashtra Corona Virus Latest Update

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुणे विभागात आतापर्यंत 4,799 जण कोरोनामुक्त, बाधितांचा आकडा 9 हजारांच्या पार

जळगावाचा कोरोना मृत्यूदर देशाच्या चौपट, देशाचा मृत्यूदर 2.87, तर जळगावचा 11.49 टक्के

पुण्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा विळखा, 33 पोलीस, तर पालिकेतील 60 कर्मचाऱ्यांना लागण

Lockdown 5.0 | हॉटेल, धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल्स कधी उघडणार? कुठे काय सुरु, काय बंद?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *