Pune Corona | पुणे विभागात आतापर्यंत 4,799 जण कोरोनामुक्त, बाधितांचा आकडा 9 हजारांच्या पार

पुणे विभागात आतापर्यंत 4 हजार 799 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पुणे विभागात 9,364 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

Pune Corona | पुणे विभागात आतापर्यंत 4,799 जण कोरोनामुक्त, बाधितांचा आकडा 9 हजारांच्या पार

पुणे : पुणे विभागात आतापर्यंत 4 हजार 799 कोरोनाबाधित (Pune Corona Cases Latest Update) रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पुणे विभागात एकूण 9 हजार 364 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 4 हजार 140 अॅक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. पुणे विभागात आतापर्यंत कोरोनाबाधित 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 209 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत (Pune Corona Cases Latest Update).

कालच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 383 ने वाढ झाली आहे. आज पुणे जिल्ह्यात 241, सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 41, सांगली जिल्ह्यात 3 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 68 अशी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

कुठल्या जिल्ह्यात किती रुग्ण?

पुणे जिल्ह्यात 7,441 रुग्ण

पुणे जिल्ह्यात 7 हजार 441 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यामध्ये 4 हजार 206 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 913 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात 322 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 195 रुग्ण गंभीर असून उर्वरित रुग्ण निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 17 कोरोनाबळी

सातारा जिल्ह्यात 482 कोरोनाबाधित रुग्ण असून 144 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 321 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 17 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे (Pune Corona Cases Latest Update).

सोलापुरात 839 कोरोनाबाधित

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 836 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 321 जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 436 आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 79 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यात 101 कोरोनाचे रुग्ण

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 55 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 43 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 504 रुग्ण, 4 कोरोनाबळी

कोल्हापूर जिल्ह्यातील 504 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 73 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात 427 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत पुणे विभागामध्ये एकूण 85 हजार 723 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 80 हजार 520 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 203 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 71 हजार 41 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 9 हजार 364 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे (Pune Corona Cases Latest Update).

संबंधित बातम्या :

पुण्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा विळखा, 33 पोलीस, तर पालिकेतील 60 कर्मचाऱ्यांना लागण

पुणे शहर ‘स्लम फ्री सिटी’ होणार, महापालिका झोपडपट्ट्या पाडून टुमदार घरं उभारणार

पुण्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होणार

पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात, महानगरपालिका आयुक्तांचा दावा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *