Lockdown 5.0 | हॉटेल, धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल्स कधी उघडणार? कुठे काय सुरु, काय बंद?

केंद्राच्या नियमावलीनुसार, हॉटेल, धार्मिक स्थळं, रेस्टोरंट हे 8 जूनपासून सशर्त उघडता येतील. देशभरात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल.

Lockdown 5.0 |  हॉटेल, धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल्स कधी उघडणार? कुठे काय सुरु, काय बंद?
Follow us
| Updated on: May 30, 2020 | 8:37 PM

नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला (Lockodwn 5.0 Guidelines) आहे. लॉकडाऊन 5.0 बाबत नवी नियमावली केंद्र सरकारने जारी केली आहे. यानुसार देशातील कोरोना कंटेन्मेंट झोनबाहेर टप्प्याटप्प्याने सूट देण्यात येणार (Lockodwn 5.0 Guidelines) आहे.

कोरोना विषाणूपासून बचावासाठी देशात गेल्या 23 मार्चपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन 4.0 चा कालावधी 31 मे रोजी संपतो आहे. त्यामुळे सरकारने हा कालावधी आणखी वाढवला आहे. लॉकडाऊन 5.0 हा 1 जून ते 30 जूनपर्यंत असेल. यादरम्यान शाळा-कॉलेज उघडण्याची जबाबदारी सरकारने राज्य सरकारांवर सोडली आहे.

केंद्राच्या नियमावलीनुसार, हॉटेल, धार्मिक स्थळं, रेस्टोरंट हे 8 जूनपासून सशर्त उघडता येतील. देशभरात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल. नागरिक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतील. त्यासाठी आता पास दाखवायचीही गरज पडणार नाही. तसेच, शॉपिंग मॉल्स आणि सलून उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नव्या नियमावलीनुसार काय सुरु काय बंद?

1. कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम असणार

2. कंटेन्मेंट झोनमध्ये 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन असणार

3. रेड झोन बाहेर 8 जूनपासून मंदिरं, मशिदी, धार्मिक स्थळं सुरु होणार

4. रेड झोन बाहेर 8 जूनपासून रेस्टॉरंट, हॉटेल्सही उघडणार

5. रेड झोन बाहेर 8 जूनपासून शॉपिंग मॉल्सनाही उघडण्याची परवानगी

6. राज्यांतर्गत किंवा राज्या अंतर्गत सर्व दळणवळणावर बंदी नाही

7. कसलीही परवानगी, मंजुरी किंवा ई-परमिटची गरज नाही

8. दळणवळणासंबंधी राज्यांना अंतिम निर्णयाचे अधिकार

9. प्रतिबंधित क्षेत्रे राज्य सरकार ठरवणार

10. प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु

11. शाळा सुरु करण्यासंबंधी जुलैमध्ये निर्णय

12. राज्यांशी चर्चा करुन शाळांबाबत निर्णय घेणार

13. सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर बंदी

14. सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा खाण्यास मनाई

Lockodwn 5.0 Guidelines

कन्टेनमेंट झोनबाहेरील गोष्टी तीन टप्प्यात खुल्या होणार

पहिला टप्पा

धार्मिक स्थळं, सार्वजनिक प्रार्थना स्थळं, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट आणि इतर सेवांसह शॉपिंग मॉल 8 जूनपासून खुले होणार.

दुसरा टप्पा 

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था राज्य सरकारांशी चर्चा करुन जुलै 2020 मध्ये खुले करता येणार आहेत. राज्य सरकार यावर निर्णय घेण्यासाठी संस्था आणि पालकांशी देखील चर्चा करु शकेल.

तिसरा टप्पा 

गृहमंत्रालयाने निश्चित केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, मेट्रो रेल्वे, सिनेमागृहं, व्यायामशाळा, स्विमिंगपूल, बार आणि इतर तत्सम ठिकाणं खुली करण्याविषयी तिसऱ्या टप्प्यात निर्णय घेण्यात येणार आहे. याच्या तारखा परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर घोषित केल्या जातील (Lockodwn 5.0 Guidelines).

संबंधित बातम्या :

LOCKDOWN 5.0 | देशातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, केंद्र सरकारकडून नियमावली जारी

Lockdown 5 | केंद्राकडून लॉकडाऊन 5 ची तयारी पूर्ण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.