AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरीही 5 ते 6 तासातच पेट्रोल, डिझेल संपतंय… पेट्रोल पंपांवर आजही रांगाच रांगा; तुमच्याकडची परिस्थिती काय?

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलची गंभीर टंचाई कायम आहे. अनेक पंपांवर 5-6 तासात इंधन संपत असल्याने नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतरही लोक कॅन आणि ड्रममध्ये इंधन साठवत आहेत, ज्यामुळे परिस्थिती अधिक बिकट होत आहे.

तरीही 5 ते 6 तासातच पेट्रोल, डिझेल संपतंय... पेट्रोल पंपांवर आजही रांगाच रांगा; तुमच्याकडची परिस्थिती काय?
पेट्रोल पंपांवर आजही रांगाच रांगा
| Updated on: May 21, 2026 | 2:24 PM
Share

राज्यात पुन्हा एकदा पेट्रोल पंपावर नागरिकांनी प्रचंड गर्दी करायला सुरुवात केली आहे. कॅन, ड्रम, बॉटल घेऊन लोक पेट्रोल आणि डिझेल भरायला जात आहेत. काही ठिकाणी तर रात्रीपासूनच लोक रांगा लावून आहेत. अनेक पेट्रोल पंपावर दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत. रणरणत्या उन्हातही लोक पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी रांगेत उभे आहेत. काही ठिकाणी तर 5 ते 6 तासातच इंधन संपत आहे. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर इंधन नाही, पेट्रोल डिझेल संपले… असे बोर्ड लावलेले दिसत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पेट्रोल आणि डिझेलचा अतिरिक्त साठा न करण्याचं आवाहन करत आहेत. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. कुऱ्हा काकोडा येथील एसआर पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागल्या आहेत. पेट्रोल घेण्यासाठी लोक एक ते अर्ध्या किलोमीटर पर्यंत रांगेत उभे आहेत. कुऱ्हा येथील दुसऱ्या द्वारका किसान पेट्रोल पंपावरही दोन दिवसापासून पेट्रोल नाहीये. दोन दिवसांपासून दोन्ही पेट्रोल पंपावर पेट्रोलची भीषण टंचाई आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी इंधनाचा साठा मुबलक असल्यांनी कोणीही इंधनाची साठवणूक करू नका? आणि अफेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलं आहे. तरीही लोक त्याकडे दुर्लक्ष करून पेट्रोल पंपांवर रांगा लावताना दिसत आहेत. पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी आलेल्या गर्दीमुळे पाच ते सहा तासातच इंधन पुरवठा संपत असल्याचं समोर येत आहे.

परभणीत वाहनांच्या रांगा

परभणीच्या वसमत रोडवर असलेल्या जिओ पेट्रोल पंप आणि अमोल पेट्रोल पंपच्या बाहेर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. रोडच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या अमोल पेट्रोल पंपावर आज सकाळपासूनच नागरिकांनी डिझेल भरण्यासाठी कॅन घेऊन गर्दी केली आहे. या ठिकाणी कॅनमध्ये डिझेल भरण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

कॅनच्या रांगा

वाशिम शहरात डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा आजही कायम असून शहरातील बहुतांश पेट्रोल पंप सकाळच्या दरम्यान बंद आहेत. तर रिसोड रोडवरील टिल्लूमल पेट्रोल पंपावर डिझेलचे वितरण सुरू आहे. मात्र या ठिकाणी शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी 4 वाजता पासून 1 ते 1500 कॅन रांगेत लावलेल्या असून कॅनची ही रांग पेट्रोल पंपाच्या बाहेरही 100 ते 150 मीटर पर्यंत मुख्य रस्त्यावर गेल्याचं पाहायला मिळालंय. डिझेल मिळत नसल्यानंशेतकरी त्रस्त झाले असून शेतकऱ्यांना डिझेलसाठी अनेक पेट्रोल पंपावर भटकंती करावे लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

पुणे ते नागपूर हायवेवर रस्ता रोको

बुलढाणा जिल्ह्यातही इंधनाचा तूटवडा भासत आहे. अशातच जिल्ह्यातील अनेक पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याने शेती मशागतीचे कामे खोळंबली आहेत. दरम्यान ट्रॅक्टर चालक, शेतकरी आक्रमक झाले असून काल मध्यरात्री पुणे ते नागपूर हा महामार्ग ट्रॅक्टर चालक, शेतकऱ्यांनी रोखून धरला होता. तब्बल एका तासानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रॅक्टर चालक आणि शेतकऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनकर्ते ट्रॅक्टर चालक, शेतकरी काल दुपारपासून चिखली जवळील मेहकर फाटा इथल्या पेट्रोल पंपावर आपली वाहन घेऊन रांगेत उभे होते. मात्र ट्रॅक्टर चालकांना डिझेल मिळत नसल्याने ते मध्यरात्री आक्रमक झाले होते. त्यामुळे त्यांनी पुणे ते नागपूर हा महामार्ग मध्यरात्रीच रोखून धरत आक्रमक झाले होते. यावेळी पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेकडो वाहने ट्रॅफिकमध्ये अडकली होती. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत केली आणि ट्रॅक्टर चालक शेतकऱ्यांची समजूत काढून त्यांना रस्ता रोखण्यास मज्जाव केला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ