Nitesh Rane : …तर आम्हाला देखील मोहरमच्या वेळी विचार करावा लागेल, नितेश राणेंचा इशारा VIDEO

Nitesh Rane : "कुठे गेला इकडचा आमदार कुठे लपून बसला ? जर आमचे सण आम्हाला साजरे करून दिले नाहीत, तर आम्हाला देखील मोहरमच्या वेळी विचार करावा लागेल" असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

Nitesh Rane : ...तर आम्हाला देखील मोहरमच्या वेळी विचार करावा लागेल, नितेश राणेंचा इशारा  VIDEO
Nitesh Rane
| Updated on: Sep 25, 2025 | 7:35 AM

“आपलं हे हिंदू राष्ट्र आहे ना..इथे कोणाचं दुसऱ्याचं चालणार नाही. आपण आपल्या हिंदू राष्ट्रांमध्ये, आपण अतिशय शांततेत कोणालाही न दुखावता आम्ही जर आमचे सण साजरे करत असू तर कोणालाही हिरव्या मिरच्या लागण्याची गरज नाही” असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. नितेश राणे हे महाराष्ट्र सरकारमध्ये मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री आहेत. नितेश राणे हे नेहमीच हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमकपणे आपली मत मांडत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांवरुन वाद निर्माण झाले आहेत. आता सुद्धा त्यांनी अशाच प्रकारच वक्तव्य केलं आहे.

“आमच्या देशामध्ये सर्वात आधी हिंदुंचे हित बघितलं जाईल आणि मग बाकीच्यांचं. हा देश हिंदुंचा आहे. इकडे सर्वधर्म समभाव नाही चालणार. इकडे आधी हिंदुंचं हित पाहिलं जाईल. कुठे गेले ते गंगा जमुना वाले?. आमच्या देवीचा हात तोडल्यानंतर तेव्हा लेक्चर द्यायला येत नाहीत” असं नितेश राणे म्हणाले.

‘ते जास्त वेळ दोन पायांवर चालणार नाहीत’

“या जियाद्यांना का नाही सांगत?.हे हिंदुत्व विचारांचं राज्य सरकार आहे. आम्ही सगळे मंत्री, आमदार हे हिंदुंच्या मतांवर झालेलो आहोत. कोणीही महाराष्ट्रातलं वातावरण खराब करू नये. तुम्ही तुमचे सण शांततेत पूर्ण करा आणि आम्ही आमचे सण व्यवस्थित साजरे करणार. कोणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही” असा इशारा नितेश राणे यांनी दिला. “प्रत्येकाला अटक करणार कोणी सुटणार नाही. देवा भाऊंचं सरकार कोणाला सोडणार नाही. आम्ही कोणाला सोडणार नाही हा तुम्हाला शब्द देतो. ज्या पण जिहाद्यांनी हे कृत्य केलं आहे, ते जास्त वेळ दोन पायांवर चालणार नाहीत” असं नितेश राणे म्हणाले.

‘…तर आम्हाला देखील मोहरमच्या वेळी विचार करावा लागेल’

“मोहम्मद बॅनर लावून काही होत नाही. हा पाकिस्तान नाही. हा हिंदुस्तान आहे.जे सर्वधर्म समभाव बोलणारे लोक आता कुठे आहेत?. कुठे गेला इकडचा आमदार कुठे लपून बसला ? जर आमचे सण आम्हाला साजरे करून दिले नाहीत, तर आम्हाला देखील मोहरमच्या वेळी विचार करावा लागेल” असा इशारा नितेश राणे यांनी दिला.