Maharashtra News LIVE : गोकुळ दूध संघाच्या मतदानाला सुरुवात
Maharashtra News LIVE : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. आता या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना काटकसरीच्या सूचना दिल्या आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
जालना जिल्ह्यात ६.३७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
जालना जिल्ह्यात यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे जवळपास 6 लाख 37 हजार हेक्टर वरील पिके उध्वस्त झाली असल्याची बाब समोर आली आहे. सध्या प्रशासनाकडून सुरू असलेल्या पंचनामाच्या अहवालातून विभाग समोर आली आहे. बदनापूर आणि भोकरदन तालुक्यात पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित तालुक्यांमधील पंचनामे चा अहवाल देखील येत्या दोन दिवसात सादर होणार आहे.
-
पुण्याच्या राक्षेवाडी घरफोडी प्रकरणात पोलिसांकडून पाच लाखांचे दागिने हस्तगत
पुणे जिल्ह्यातील राक्षेवाडी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणात खेड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात आरोपी साहील भांबुरे आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तपास करत 4 लाख 95 हजार 650 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. खेड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली आहे.
-
-
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या मतदानाला सुरुवात
गोकुळ दूध संघाच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सुरवातीच्या टप्प्यात उमेदवारांकडूनच मतदान उरकून घेण्यावर भर देण्यात येत आहे. सतेज पाटील यांच्या समविचार आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चूयेकर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. महायुती आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडी कडूनही आपापल्या ठराव धारकांना एकत्रितच मतदान केंद्रावर आणलं जाणार आहे.
-
ऐन सणासुदीचा काळात फुलांना भाव जेमतेमच
नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहावयास मिळत आहे. दसरा सण देखील दोन दिवसांवर येऊन ठेपलेलाय. सणासुदीच्या काळात पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी हा शेतातील फुले घेऊन आलेला आहे. तर पुण्यातील नागरिक देखील खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये गर्दी केलेली आहे. सणासुदीच्या काळातही फुलांना जेमतेमच भाव मिळत आहे.
-
मुंबईला पुन्हा वायू प्रदूषणाचा विळखा
मुंबईत पुन्हा वायू प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील काही दिवसांत शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. ऑक्टोबर हिटसोबत प्रदूषण कमालीचं वाढलं आहे. शहारातील एक्युआय २२१ वर पोहोचला आहे. दादार , प्रभादेवी, वरळी , कुलाबा या भागात सगळ्यात जास्त प्रदूषण आहे.
-
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. दुष्काळामुळे खर्चकपातीच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व विभागांना काटकसरीच्या सूचना दिल्या आहेत. राज्याच्या तिजोरीवरील वाढता आर्थिक ताण लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व विभागांच्या निधी खर्चात २० टक्के कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रस्ते आणि सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर शिक्षण, आरोग्य, कर्जमुक्ती, लाडकी बहीण यांसारख्या योजनांवरील निधीत कपात न करण्याची सूचना दिल्यात. तसेच आज कोल्हापुरातील गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीचं मतदान पार पडत आहे. जगासहित देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
Published On - Oct 18,2026 8:47 AM
