Maharashtra News LIVE : राज्यात पावसाचा मोठा इशारा, मुसळधार राऊस कोसळणार..

Maharashtra News LIVE : निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांकडून देशभरात आंदोलनाचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच राज्यात दुष्काळाची स्थिती आहे.

Maharashtra News LIVE : राज्यात पावसाचा मोठा इशारा, मुसळधार राऊस कोसळणार..
tv9 marathi blog
| Updated on: Sep 30, 2026 | 9:35 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 30 Sep 2026 09:20 AM (IST)

    रोहित पवार-दादा भुसे एकाच मंचावर

    नाशिकमद्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळ्यासाठी आमदार रोहित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित राहणार आहेत. जयंती सोहळ्या निमित्त मॅरेथॉन चौकातून शोभायात्रा काढली जाणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या २८ शाळांतील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होईल. कर्मवीरांच्या जीवनप्रवासाचे दुर्मिळ छायाचित्रांतून दर्शन घडवले जाणार आहे.

  • 30 Sep 2026 09:10 AM (IST)

    अधिकारी, कर्मचारी रजेवर गेल्यास गुन्हे दाखल होणार-जिल्हाधिकारी

    सोलापुरात दुष्काळी स्तिथीत अधिकारी, कर्मचारी विनाकारण रजेवर गेल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत. दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील दुष्काळाच्या उपायोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसाठी आदेश काढले आहेत. महसूल, कृषी, ग्रामविकास आणि जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांसाठी आदेश देण्यात आले आहेत.


  • 30 Sep 2026 09:00 AM (IST)

    नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना मोठे आवाहन

    दुष्काळी परिस्थितीच्या धर्तीवर विमा कंपनी आणि शासनाच्या तांत्रिक निकषानुसार मदत मिळण्यासाठी वस्तूनिष्ठ पीक कापणी प्रयोग होणे गरजेचे आहे. पीक कापणी प्रयोगासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी प्रयोग पूर्ण होईपर्यंत पिकांची कापणी, काढणी किंवा शेताची नांगरणी करू नये. पीक कापणी प्रयोगाला शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे महत्वपूर्ण आवाहन केले आहे. पीक विम्याची भरपाई आणि प्रत्यक्ष नुकसान निश्चितीसाठी पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. दुष्काळाने पीक पूर्ण करपली असल्यास शून्य उत्पादन पंचनामा होईल,त्यामुळे पीक पूर्णपणे नष्ट झाले तरी घाईने पीक काढू नये, असे आवाहन त्यांनी केले.

  • 30 Sep 2026 08:40 AM (IST)

    अमेरिकेत बनावट ‘ओझेंपिक’ औषधांची विक्री; दोन भारतीय नागरिकांविरोधात गुन्हा

    अमेरिकेत बनावट ‘ओझेंपिक’ औषधांची विक्री आणि तस्करी केल्याच्या आरोपावरून दोन भारतीय नागरिकांविरोधात फ्लोरिडातील फेडरल न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नदीप रॉय आणि विकी रामंचा या दोघांवर अमेरिकेतील वितरकांना अत्यंत कमी किमतीत बनावट ‘ओझेंपिक’ औषधे विकल्याचा आरोप आहे. याप्रकरणी स्वप्नदीप रॉयला इटलीतून अमेरिकेत प्रत्यार्पित करण्यात आले असून, मंगळवारी त्याला फ्लोरिडातील टँपा न्यायालयात हजर करण्यात आले.

  • 30 Sep 2026 08:34 AM (IST)

    कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातून दिवसाढवळ्या रिक्षा चोरी; घटना CCTV मध्ये कैद

    कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात भरदुपारी रिक्षा चोरीची घटना समोर आली आहे. महालक्ष्मी हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला उभी केलेली रिक्षा चोरट्याने लॉक आणि वायर तोडून पळवून नेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून महात्मा फुले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या रिक्षा चोरी झाल्याने रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


  • 30 Sep 2026 08:32 AM (IST)

    मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीवर अंमली पदार्थ विरोधी कक्षाने कारवाई केली

    मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीवर अंमली पदार्थ विरोधी कक्षाने कारवाई केली आहे. खार पश्चिम येथील 13 क्रॉस, 19 रोड परिसरात गस्तीदरम्यान पोलिसांना एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळून आली. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल 3 किलो 60 ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत 9 कोटी 9 लाख 90 हजार रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने ही कारवाई केली.

  • 30 Sep 2026 08:31 AM (IST)

    मुंबईत सध्या सुरू असलेली 10 टक्के पाणीकपात मागे घेण्याची मागणी

    मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं 97 टक्के भरल्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेली 10 टक्के पाणीकपात मागे घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र सध्या धरणात असलेलं पाणी पुढील वर्षी मे महिन्याच्या मध्यापर्यंत पुरू शकतं. त्यानंतर राखीव साठ्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. मात्र राज्याच्या इतर भागातील दुष्काळाचा विचार पाणीकपात मागे घेण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधून घेतला जाणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबत पालिका सभागृहात याबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.

     

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला. यासोबतच विद्यार्थ्यांची फीस देखील बोर्डाने माफ केली. एल निनोचा मोठा प्रभाव राज्यात बघायला मिळतोय. 2027 मध्ये एल निनोचे संकट अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यातच परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालणार आहे. हवामान विभागाने तसा इशारा देखील दिला. पुणे शिक्षक मतदार संघानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पदवीधर मतदार संघाचीही मागणी. पुणे पदवीधर मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर इच्छुक. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली. भाऊसाहेब आंधळकरांनी यापूर्वी शिवसेनेकडून बार्शी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us