महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा…!

| Updated on: Jan 16, 2022 | 5:05 PM

महाराष्ट्र पक्षीमित्रच्या चार दशकपूर्ती वर्षानिमित्त एक दशकपूर्ती विशेषांक काढण्यात आला आहे. या अंकाचे सोलापूर येथे झालेल्या 34 व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रकाशन करण्यात आले.

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा...!
महाराष्ट्र पक्षीमित्रच्या दशकपूर्ती विशेषांकाचे सोलापूर येथे झालेल्या 34 व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रकाशन करण्यात आले.
Follow us on

नाशिकः राज्यभर पक्षांसाठी जीव ओतून काम करणाऱ्या महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेने 4 दशकांची कारकीर्द पूर्ण केली आहे. नुकतीच म्हणजे 10 जानेवारी 2022 रोजी या संघटनेला 40 वर्षे पूर्ण झाली. या कालखंड आजपर्यंत संघटनेने 34 राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलने आणि विभागीय स्तरावरील 30 पक्षीमित्र संमेलनांचे आयोजन करून महाराष्ट्रभर पक्षी अभ्यासक व पक्षी संरक्षकांचे एक मजबूत जाळे निर्माण केले आहे. महाराष्ट्र पक्षीमित्रचे आज राज्यात 1300 पेक्षा जास्त सभासद असून, अनेक स्थानिक स्तरावरील समविचारी संस्था या चळवळीसोबत जोडल्या गेल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे संचालक किशोर गठडी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

दशकपूर्ती विशेषांक

महाराष्ट्र पक्षीमित्रच्या चार दशकपूर्ती वर्षानिमित्त एक दशकपूर्ती विशेषांक काढण्यात आला आहे. या अंकाचे नुकतेच 1 जानेवारी रोजी सोलापूर येथे झालेल्या 34 व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. निनाद शाह, राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष शेषराव पाटील, महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. राजू कसंबे, आयोजक संस्थेचे डॉ. व्यंकटेश मेतन, सोलापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, एमआयटीच्या प्रा. स्वाती कराड तसेच या अंकाचे सहाय्यक संपादक किरण मोरे व अनिल माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

चार दशकांचा आढावा

पक्षीमित्रच्या अंकामध्ये पक्षीमित्र चळवळीच्या चार दशकांचा आढावा घेणारे जेष्ठ मंडळींचे एकूण 13 लेख आहेत. आजवर पार पडलेल्या राज्यस्तरीय व विभागीय संमेलनांची माहिती, या चळवळीने आजवर राबविलेले विविध उपक्रम तथा चळवळीची उपलब्धी अशी आठवणींना उजाळा देणारी ऐतिहासिक माहिती आहे. तसेच ऐतिहासिक अशा शंभरपेक्षा जास्त छायाचित्रांचा संग्रह प्रकाशित केलेला आहे. या अंकासाठी लेख तथा छायाचित्र व निधी संकलन यासाठी महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, कार्यवाह प्रा. डॉ. गजानन वाघ, सभासद सौरभ जवंजाळ यांनी परिश्रम घेतले आहेत. अंकाचे संपादक दिगंबर गाडगीळ, सहाय्यक संपादक किरण मोरे आहेत. अनिल माळी यांनी अंकाचे संपादन केले आहे. हा अंक महाराष्ट्र पक्षीमित्रच्या सभासदांना वितरित केला जाणार आहे.

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेने 4 दशकांची कारकीर्द पूर्ण केली आहे. नुकतीच म्हणजे 10 जानेवारी 2022 रोजी या संघटनेला 40 वर्षे पूर्ण झाली. या कालखंड आजपर्यंत संघटनेने 34 राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलने आणि विभागीय स्तरावरील 30 पक्षीमित्र संमेलनांचे आयोजन करून महाराष्ट्रभर पक्षी अभ्यासक व पक्षी संरक्षकांचे एक मजबूत जाळे निर्माण केले आहे. आपण साऱ्यांनीही या कार्यात सहभागी व्हावे आणि पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा.
– किशोर गठडी, संचालक, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना

इतर बातम्याः

Nashik | नाशिक बाजार समितीत 500 कोटींचा घोटाळा; भाजपची ‘ईडी’कडे तक्रार, प्रकरण काय?

Nashik | 127 किमी वेगाने दुचाकी झाडावर आदळली; 2 मित्र 30 फूट खोल खड्ड्यात पडून गतप्राण

Nashik | थाप मारून थापाड्या गेला, मंत्रालयात ओळख असल्याचे सांगत नणंद-भावजयीला 43 लाखांना फसवले