Weather Update : कोकणात पुन्हा सरी, प्रत्येक जिल्ह्यात पावसाचा अंदाज समोर; जाणून घ्या!

Maharashtra Rain Update : हवामान विभागाने एक महत्त्वाची सूचना दिली आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत दक्षिण कोकणासह इतरही ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

Weather Update : कोकणात पुन्हा सरी, प्रत्येक जिल्ह्यात पावसाचा अंदाज समोर; जाणून घ्या!
rain update
| Updated on: Jun 02, 2025 | 3:23 PM

Maharashtra Weather Update : राज्यात मान्सून दाखल झाल्यामुळे आता पेरणीच्या कामांना वेग आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ अशा सर्वच भागात पेरणीसाठी तयारी चालू आहे. दरम्यान, काही दिवसांची विश्रांती घेऊन आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस परतण्याची शक्यता आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार दक्षिण कोकणात आगामी काही दिवसांत सरी बसरण्याची शक्यता आहे. पुढच्या पाच दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. तशी शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

हवामानाचा ताजा अंदाज काय?

मुंबईच्या विभागीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आगामी काही दिवसांत दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे.
मुंबईच्या हवामान विभागाने 1 ते 5 जून या पाच दिवसांसाठी हवामानाचं अंदाज व्यक्त केला होता. याच अंदाजानुसार राज्यात मुंबई, ठाणे तसेच कोणणातील काही जिल्ह्यांत ढग जमा झालेले दिसत आहेत. त्यामुळे आगामी तीन दिवसांत या भागात पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाज्यात प्रत्येक जिल्ह्यात पावसाचा अंदाज काय आहे?

पालघर- हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

ठाणे- हलका ते मध्यम स्वरुपाचा तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस

मुंबई- हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

रायगड- हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

रत्नागिरी- हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

सिंधुदूर्ग- हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

धुळे- हलका ते मध्यम स्वरुपाचा विजांच्या कडकडाटासह पाऊस

नंदूरबार-हलका पाऊस, ढगांचा गडगडाट

जळगाव- हलका पाऊस, गडगडाट

नाशिक- तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

नाशिकचा घाटपरिसर- तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस

अहिल्यानगर- विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

पुणे- हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, विजांचा कडकडाट

कोल्हापूर- एक दोन ठिकाणी हलका पाऊस

सातारा- एक दोन ठिकाणी हलका पाऊस

सांगली- एक दोन ठिकाणी हलका पाऊस

सोलापूर- हलका ते मध्यम पाऊस, विजांच्या कडकडाटासह पाऊस

छत्रपती संभाजीनगर- हलका पाऊस गडगडाट

जालना- हलका पाऊस, गडगडाट

परभणी- हलका पाऊस, गडगडाट

बीड- हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

हिंगोली- हलका पाऊस,गडगडाट

नांदेड- हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

लातूर- हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

धाराशीव- हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

भंडारा-विजांचा कडकडाट, वारे

चंद्रपूर – विजांचा कडकडाट, जोरदार वारे

गडचिरोली- विजांचा कडकडाट, जोरदार वारे

गोदिया- विजांचा कडकडाट, जोरदार वारे

नागपूर- विजांचा कडकडाट, जोरदार वारे

वर्धा- विजांचा कडकडाट, जोरदार वारे