Drought And Water Tanker : 635 गावं, 2447 वाड्या, राज्यात 800 टँकरने पाणीपुरवठा, मराठवाड्याची सर्वाधिक होरपळ!

सध्या उत्तर महाराष्ट्रात एकूण 176 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. नाशिक 15 तर अहिल्यानगर 161 टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. पश्चिम महाराष्ट्र एकूण 218 टँकरने सामान्यांना पाणी पुरवले जातेय.

Drought And Water Tanker : 635 गावं, 2447 वाड्या, राज्यात 800 टँकरने पाणीपुरवठा, मराठवाड्याची सर्वाधिक होरपळ!
maharashtra drought and water tanker
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 8:18 PM

Drought And Water Scarcity : दुष्काळामुळे राज्या होरपळले आहे. आज राज्य सरकारने आणखी काही तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर केले. या घोषनेनंतर आता राज्यात दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ही 305 वर गेली आहे. सोबतच सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीआधी 5000 रुपयांची अग्रीम मदत करण्याची घोषणा केली आहे. दुष्काळ पडलेला असल्याने शेतकऱ्यांना मदत केली जाईल. सरकार कुठेही मागे पडणार नाही, असेही सरकारने सांगितले आहे. दरम्यान सरकार दुष्काळ निवारणासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करत असताना दुसरीकडे दुष्काळाचे भीषण रुप समोर आले आहे. मराठवाडा दुष्काळाने होरपळत असून शकडो गावं आणि हजारो वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातोय.

दुष्काळाची सर्वाधिक होरपळ मराठवाड्याला?

समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात 10 जिल्ह्यांतील 635 गावं आणि 2447 वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शासकीय 15 आणि खासगी 768 टँकरने हा पाणीपुरवठा केला जातोय. सध्या पाण्याचे सर्वाधिक दूर्भिष्य हे मराठवाड्यात निर्माण झाले आहे. मराठवाड्यात सध्या सर्वाधिक 374 टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 169 टँकर आहेत.

Loading...

कोणत्या जिल्ह्यात किती टँकरने पुरवठा?

सध्या उत्तर महाराष्ट्रात एकूण 176 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. नाशिक 15 तर अहिल्यानगर 161 टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. पश्चिम महाराष्ट्र एकूण 218 टँकरने सामान्यांना पाणी पुरवले जातेय. यात
पुणे जिल्ह्यात सध्या 8 सातारा जिल्ह्यात 38, सांगली जिल्ह्यात 49 तसेच सोलापूर जिल्ह्यात 123 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. मराठवाड्यात सर्वाधिक 374 टँकरने पाणी पुरवले जातेय संभाजीनगरात 169, जालना जिल्ह्यात 29, बीड जिल्ह्यात 166 तर धाराशीवमध्ये 10 टँकरने पाणी पुरवले जातेय.

दरम्यान, सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाणी जपून वापरावे. तसेच अगोदर पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी. काटकसरीने वागावे असे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता काही मोठ्या शहरांत पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us