AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

weather forecast : पुढचे 24 तास अत्यंत धोक्याचे, महाराष्ट्रावर मोठं संकट, राज्यात कुठे-कुठे शळांना सुट्टी?

हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा एकदा मोठा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे, तसेच काही भागांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

weather forecast : पुढचे 24 तास अत्यंत धोक्याचे, महाराष्ट्रावर मोठं संकट, राज्यात कुठे-कुठे शळांना सुट्टी?
उष्णतेच्या लाटेचा इशारा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 17, 2026 | 5:15 PM
Share

सध्या वातावरणात मोठे बदल पहायला मिळत आहेत, याचा आरोग्यावर देखील मोठा परिणाम होत आहे.  एकीकडे महाराष्ट्र उन्हाने चांगलाच तापला आहे. मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे, अनेक जिल्ह्यांमधील तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलं आहे. वाढत्या तापमानाचा नागरिकांना चांगलाच फटका बसत असून, रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. दरम्यान राज्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट  

नागपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे.  नागपुरात तापमानाचा पारा वाढला आहे. जिल्ह्यात तापमान 43 अंश सेल्सियस पार पोहचलं आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या 18 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाकडून नागपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, तसेच खासगी कोचिंग क्लासेसला देखील सुट्टी देण्यात आली आहे.  उन्हाचा कडाका वाढल्यानं रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. अति महत्त्वाचं काम असेल तरच दुपारच्यावेळी घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं आवाहानही प्रशासनच्या वतीने करण्यात आलं आहे.  वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिक देखील योग्य ती खबरदारी घेताना दिसून येत आहेत.

मराठवाडा तापला  

दरम्यान एकीकडे विदर्भात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे, अनेक जिल्ह्यांचं तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात देखील उष्णतेत चांगलीच वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे 40 ते 41 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे.  उन्हाचा कडाका वाढल्यामुळे शितपेयांच्या मागमीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. नागरिक उन्हाच्या कडाक्यामुळे घराबाहेर पडणं टाळत आहे. पुढील काही दिवस उन्हाचा कडाका कायम राहू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ