
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यातील स्वारगेट बस डेपोत एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची दोन दिवसांपूर्वी छेड काढण्यात आली. मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेदरम्यान ही घटना घडली. सध्या सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे सरकारवर विरोधकांकडून विविध आरोप होत आहेत. त्यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी नुकतंच स्वारगेट बस डेपोला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वारगेट प्रकरणी एक मोठा खुलासा केला. स्वारगेटची घडलेली घटना ज्यापद्धतीने हाताळली गेली, तेही अतिशय असंवेदनशील आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवस, आठवडे आणि महिन्यांमध्ये सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात प्रचंड गुन्हेगारी वाढलेली दिसत आहे. जी गुन्हेगारी वाढलेली आहे, त्यात प्रकर्षाने महिलांवर होणारे अत्याचार आणि आज सकाळी चाकणला जी घटना घडली ती अतिशय धक्कादायक होती. चाकणवर वर्दीवर असलेल्या पोलिसावर कोयता गँगने चाकू हल्ला केला. काल रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत पोलिस असतानाही गैरवर्तन झालं हे अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आणि वाईट आहे. मी त्याचा जाहीर निषेध करते. त्यासोबत स्वारगेटला जी घटना घडली किंवा सातत्याने अशा अनेक घटना ज्या महाराष्ट्रात घडतात या खूप दुर्दैवी आहे. स्वारगेटची घडलेली घटना ज्या पद्धतीने हाताळली गेली, तेही अतिशय असंवेदनशील आहे”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
“मला या सरकारकडूमुलीला प्रचंड भीती दाखवली गेली.न जास्त अपेक्षा होत्या. याबाबत मंत्र्यांनी थोड तरी संवेदनशील राहावं. सर्वांच्या घरात लेकी-सुना आहे. सर्वांच्या घरात मुली आहेत. अशा गलिच्छ घटना झाल्यानंतर कोणत्या जबाबदार व्यक्तीने संवेदनशील पद्धतीने बोलायला हवं. स्वारगेट बस स्टॉपपासून मेन रोड ५० पावलांवर आहे. पोलीस स्टेशनही जवळ आहे. ही घटना अंधारात कोपऱ्यात घडलेली नाही. त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली. आपण सर्वांनी अशा घटनांचा एक समाज म्हणून निषेध करायला हवा”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“जेव्हा बदलापूरची घटना घडली, तेव्हाही मी गृहमंत्र्यांना विनंती केली होती की महाराष्ट्राने देशाला एक उदाहरण द्यावं की अशा लोकांना चौकात फाशी दिली पाहिजे. हे माझं मत आहे. तुम्ही लाडकी बहीणबद्दल इतकं काही बोलता मग या केसमध्ये जे काही स्टेटमेंट करता ते योग्य आहे का? कोणाच्या तरी घरातली ती मुलगी होती, ती घाबरलेली होती आणि अशी वक्तव्य करणं कोणालाही शोभत नाही”, अशा शब्दात त्यांनी टीका केली.
“सरकार मुंडे आणि कोकाटे यांना पाठीशी घालत आहेत. नैतिकता आणि त्यांची कधीचं भेट झाली नाही. माझी अपेक्षा होती जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांनी स्वतःहून मंत्री पदापासून त्यांनी दूर रहावे. त्यांना सो खून माफ आहेत, ज्यांना खडणी माफ आहेत, त्यांना नियम कायदे नाहीत, नियम वैगरे सर्व आपल्यासाठी आहेत. बीड आणि परभणी दौरा केल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागत आहे. त्या माउलींच्या व्यथा मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकायच्या आहेत. यामध्ये मला कुठलंही राजकारण आणायचे नाही. राजीनामा दूर आधी मी वेळ मागत आहेत”, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले.