LIVE : सायन-पनवेल महामार्ग बुडाला, सुदैवाने वाहन चालक वाचले

दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी एका क्लिकवर फक्त टीव्ही 9 मराठीवर...

LIVE : सायन-पनवेल महामार्ग बुडाला, सुदैवाने वाहन चालक वाचले
Picture

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पंढरपुरात

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पंढरपुरात, प्रथमच सोबत विठ्ठल रखुमाईची महापूजा करणार, शिवसेनेचे सर्व खासदारही हजर राहणार

08/07/2019,11:50PM
Picture

सायन-पनवेल महामार्ग बुडाला, सुदैवाने वाहन चालक वाचले

सायन-पनवेल महामार्ग बुडाला, सुदैवाने वाहन चालक वाचले, महापालिका सिडकोची आपत्कालीन यंत्रणा पुन्हा कोलमडली

08/07/2019,11:45PM
Picture

अंधेरीत भिंत कोसळली

08/07/2019,1:01PM
Picture

महात्माह गांधींच्या वर्धा जिल्ह्यात अवैध दारुविक्री

महात्मा गांधीच्या वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री, नागपूर आणि यवतमाळ या शेजारच्या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दारुची तस्करी, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती, 12 तारखेला वर्धा शहरात दारुबंदीबाबात बैठक

08/07/2019,12:37PM
Picture

कर्नाटकात उपमुख्यमंत्र्यांसह 32 मंत्र्यांचे राजीनामे

कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप, उपमुख्यमंत्र्यांसह 32 मंत्र्यांचे राजीनामे, सर्व आमदारांचेही राजीनामे

08/07/2019,12:32PM
Picture

रत्नागिरीत दोघांवर बिबट्याचा हल्ला

रत्नागिरी येथे दोघांवर बिबट्याने हल्ला केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी, विक्रांत दीपक जाधव (17) आणि योगेश विलास जाधव (30) अशी जखमी झालेल्यांची नावं, दोघेही जाधववाडी मावळंगे इथले रहिवासी, जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखलं केलं.

08/07/2019,12:29PM
Picture

राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल

राज ठाकरे मुख्य निवडणूक आयुक्तांकडे ईव्हीएम मशीनबद्दल तक्रार करणार आहेत. ठाकरेंसोबत अनिल शिदोरे आणि अविनाश अभ्यंकर उपस्थित

08/07/2019,12:23PM
Picture

शरद पवार तिवरे गावात दाखल

शरद पवार तिवरे गावात दाखल, तिवरे धरण दुर्घटनास्थळाला शरद पवार भेट देणार, मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांची भेट घेणार, पवारांसोबत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित

08/07/2019,12:21PM
Picture

जॉब न देणाऱ्यांना गोळ्या घालण्याची धमकी

जॉब न देणाऱ्यांना गोळ्या घालण्याची धमकी, असे पोस्टर्स नागपूरच्या बस स्टॉपवर लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोस्टर्समध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊन ईब्राहीमच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

08/07/2019,10:29AM
Picture

मुंबईत पावसाला सुरुवात

मुंबईत पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात झाली, आज दिवसभर मुंबईच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

08/07/2019,8:35AM
Picture

नागपूर येथील कुही परिसरात भीषण अपघात

नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने रेतीच्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली, अपघातात चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती, काल रात्री 9 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील पाच जणांवर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.

08/07/2019,8:31AM
Picture

गोवंडीत दुमजली घर कोसळले

गोवंडीच्या शिवाजी नगर विभागात एक दुमजली घर कोसळून सहा जण जखमी झालेत. मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान या घराचा वरचा मजला कोसळला आणि एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई पोलीस दाखल झाले. त्यांनी जखमींना त्वरित राजावाडी रुग्णालयात उपचारास दाखल केले असून सर्व जखमींची तब्येत स्थिर आहे.

08/07/2019,8:25AM
Picture

सोलापूरमध्ये परिवहन कर्मचाऱ्यांचं तीव्र आंदोलन

परिवहन कर्मचाऱ्यांचं आणखी तीव्र आंदोलन, 80-100 कर्मचाऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन, थकीत पगार मिळावे म्हणून मागील 11 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरु होते, काम बंद आंदोलनाची दखल न घेतल्याने पाण्याच्या टाकीवर चढत ‘शोले स्टाईल’ने आंदोलन

08/07/2019,8:23AM
Picture

नाशिक - पंचवटी परिसरात जुन्या इमारतीचा पुढचा भाग कोसळला

नाशिक – पंचवटी परिसरात जुन्या इमारतीचा पुढचा भाग कोसळला, हेमकुंज परिसरातील हर्षवर्धन सोसायटीचा पुढचा भाग कोसळला, दोन दिवसांपूर्वी इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरीत केले, इमारत रिकामी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

08/07/2019,8:19AM
Picture

नागपूर जिल्ह्यातील कुही परिसरात भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने रेतीच्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली, या धडकेत चार जण जागीच ठार, तर 7 जण जखमी, पाच जणांवर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू, रात्री 9 च्या सुमारास घडली घटना

08/07/2019,7:22AM
Picture

काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरुच

मिलिंद देवरांचा मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा, ज्योतिरादित्य शिंदे यांचाही काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा, काँग्रेसला मोठा धक्का

08/07/2019,7:19AM
Picture

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर

दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार, ईव्हीएम विरोधातील भूमिका मांडण्यासाठी राज ठाकरे तब्बल 14 वर्षांनी दिल्लीत

08/07/2019,7:15AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *