Chhagan Bhujbal: महायुतीत एकमेकांवर टीका करणाऱ्यांना आता लगाम लागणार; समन्वय समितीचा कठोर निर्णय, बैठकीत काय ठरलं? छगन भुजबळांनी सगळंच सांगितलं

Chhagan Bhujbal Sends Message to Mahayuti Leaders: महायुतीच्या घरातच वादाची ठिणगी पडू नये म्हणून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नेत्यांच्या वक्तव्यांवर समन्वय समितीची करडी नजर राहणार आहे.

Chhagan Bhujbal: महायुतीत एकमेकांवर टीका करणाऱ्यांना आता लगाम लागणार; समन्वय समितीचा कठोर निर्णय, बैठकीत काय ठरलं? छगन भुजबळांनी सगळंच सांगितलं
Mahayuti Leaders Told to Resolve Disputes Within Their Own Parties
| Updated on: Nov 18, 2026 | 6:56 PM

महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकमेकांचे नेते आणि कार्यकर्ते प्रवेश करत असल्याच्या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. काही वेळा एखाद्या पक्षातील व्यक्तीला काही गोष्टी पटत नाहीत आणि ती दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेते. मात्र अशा वेळी संबंधित पक्षांनी या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. महायुतीच्या बाहेर जाण्यापेक्षा संबंधित व्यक्ती महायुतीतच राहील, याचा विचारही पक्षांनी करायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना समन्वय समितीने सक्त सूचना दिल्या आहेत.

शायना एनसी यांच्याशी संबंधित विषयावर विचारलं असता मला याबाबत माहिती नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही, असं सांगत भुजबळ यांनी अधिक बोलणं टाळलं. महायुतीतील नेत्यांनी वाद टाळून समन्वय राखण्याची गरज असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवरही छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. संबंधित घटना घडली त्या दिवशीच शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाचं राजकारण करू नये, अशी भूमिका मांडली होती. हा निव्वळ अपघात असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे रोहित पवार यांनी आपल्या पक्षाध्यक्षांच्या भूमिकेचा विचार करायला हवा, असं भुजबळ म्हणाले.

Loading...

या प्रकरणाची चौकशी यंत्रणांकडून सुरू आहे. चौकशीतून काही तथ्य समोर आलं, तर त्यावर भाष्य करता येईल. मात्र, आपल्याला जे वाटतं तेच सत्य असतं असं नाही. पक्षाचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आपली भूमिका मांडत असताना रोहित पवार यांनीही संयम राखला पाहिजे, असा सल्ला भुजबळ यांनी दिला. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकरी आणि सामान्य नागरिकांना कर्जवसुलीसाठी त्रास दिला जात असल्याच्या मुद्द्यावरही भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नियमबाह्य वसुली किंवा कंपन्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. अशा कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनांची दखल घ्यावी. तसेच जिल्हा प्रशासनानेही अशा कंपन्यांविरोधात तातडीने कारवाई करावी. सध्या नागरिकांना त्रास देण्याची वेळ नाही, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

तसेच मित्रपक्षांवर टीका करण्याआधी दहावेळा विचार करा. नाराजी असेल तर थेट वरिष्ठांकडे जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महायुतीत आता एकमेकांविरोधात बोलायचं नाही. मुख्यमंत्र्यांवर आरोप झाल्यास तिन्ही पक्ष मिळून उत्तर देणार आहेत, असा निर्णय समन्वय समितीने दिला आहे, अशी छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us