AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगेच्या लढ्याला मोठं यश, 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, मंत्रालयात मराठा कक्षाची स्थापना होणार, मोठी घोषणा समोर

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आज आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम उद्या 12 वाजेपर्य़त सुरु करणार असून पहिले प्रमाणपत्र मनोज दादांच्या हातातून देणार असल्याची घोषणा केली.

जरांगेच्या लढ्याला मोठं यश, 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, मंत्रालयात मराठा कक्षाची स्थापना होणार, मोठी घोषणा समोर
Prasad lad and JarangeImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 02, 2026 | 9:39 PM
Share

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आज आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम उद्या 12 वाजेपर्य़त सुरु करणार असून पहिले प्रमाणपत्र मनोज दादांच्या हातातून देणार असल्याची घोषणा केली. तसेच मंत्रालयात मराठा कक्षाची स्थापना होणार असल्याचीही माहिती लाड यांनी दिली आहे.

तुमच्या मनात जे आहे तेच होणार – लाड

प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी बोलताना लाड यांनी म्हटले की, ‘दादा, मी विनंती करायला आलो आहे. मी पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगतोय उपोषण करु नका. तुमच्या मनात जे आहे तेच होणार आहे. तुमचा विषय सोडवण्यासाठी आम्ही आहोत. काल रात्रीपासून मलाही झोप लागली नाही. डोळ्यात अश्रु आहेत. मी आज तुमचा भाऊ म्हणून आलोय. जरांगेंना साथ देण्यासाठी आलो आहे. त्यांच्या 15 मागण्याची उत्तर पाठवली होती. दादांना प्रशासनाशी बोलायचे नव्हते. त्यांच्या मोठ्या भावाच्या रुपाने आलो आहे.

मंत्रालयात कक्ष स्थापन होणार

पुढे बोलताना प्रसाद लाड यांनी म्हटले की, राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमंध्ये नोंदी लावल्या जाणार आहेत. जिल्हानिहाय पेन ड्राईव दिले आहेत. आपण 6 कोटी मराठे आहोत. आपण कमी नाही आहोत. अर्जदारांनी फक्त अर्ज करायला पाहिजे. अर्ज केला नाही तर प्रमाणपत्र कसं मिळणार? जिल्हानिहाय नोडल ऑफिसर नेमला आहे. मंत्रालयातही कक्ष स्थापण करत आहोत. हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र देण्याचे काम उद्या 12 वाजेपर्य़त सुरु करणार. पहिले प्रमाणपत्र दादांच्या हातातून देणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार दादांच्या मागे उभे आहे.

सरकार तुमच्या पाठीशी – लाड

प्रसाद लाड यांनी पुढे बोलताना म्हटले की, आम्ही सगळे इथे आलो आहोत, आम्ही तत्काळ इथे निर्णय करणार आहोत. मी दादांना सांगितलं होतं की, नतद्रष्ट लोकांनी आरक्षण रद्द होण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. पण फडणवीस आणि शिंदे सरकार पाठीशी आहे. साठे साहेब राज्याचे AG आहेत. हैदराबाद गॅझेट साठी आपण त्यांना उभं केलं आहे. शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की हे रद्द होऊ देणार नाही.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल