अग्नीपथ योजनेविरोधात मालेगाव, बीडमध्ये तरुणांचं आंदोलन, चार वर्षानंतर आम्ही करायचं काय? तरुणांचा सवाल!

| Updated on: Jun 18, 2022 | 3:30 PM

17 ते 23 वयोगटातील तरुणांची चार वर्षाकरिता सैन्य भरती केली जाईल. सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीवर घेतले जाईल. त्यानंतर त्यापैकी काहींनाच नोकरीत सेवेवर घेतले जाईल तर बहुतांश जणांची सेवा खंडित करण्यात येणार आहे. मात्र अशा प्रकारे फक्त चार वर्षांच्या कंत्राटावर तरुणांना नोकरीवर घेणं, हे अयोग्य असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसने या योजनेला तीव्र विरोध केला आहे. तसंच ही योजना मागे घेण्याचीही मागणी केली आहे.

अग्नीपथ योजनेविरोधात मालेगाव, बीडमध्ये तरुणांचं आंदोलन, चार वर्षानंतर आम्ही करायचं काय? तरुणांचा सवाल!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिकः केंद्र सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या अग्नीपथ योजनेविरोधात (Agnipath Scheme) देशभरातसह राज्यातूनही विरोध केला जात आहे. केवळ चार वर्षांच्या कंत्राटी पद्धतीवर सैन्याची भरती होणार असेल तर सैनिक होण्यासाठी अनेक वर्षे मेहनत घेतलेल्या तरुणांनी चार वर्षानंतर काय करायचं, असा सवाल येथील तरुणांनी विचारला आहे. मालेगावमध्ये (Malegaon Protest) आज मोदी सरकारच्या तरुणांनी हे आंदोलन केलं. यात सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांचा सहभाग होता. युवा आर्मी भरतीच्या तरुणांनी एकत्रित येत येथील तहसील कार्यालयाबाहेर केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन केलं. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीपथ या योजनेअतंर्गत 17 ते 23 वयोगटातील तरुणांची चार वर्षाकरिता सैन्य भरती केली जाईल. सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीवर घेतले जाईल. त्यानंतर त्यापैकी काहींनाच नोकरीत सेवेवर घेतले जाईल तर बहुतांश जणांची सेवा खंडित करण्यात येणार आहे. मात्र अशा प्रकारे फक्त चार वर्षांच्या कंत्राटावर तरुणांना नोकरीवर घेणं, हे अयोग्य असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसने या योजनेला तीव्र विरोध केला आहे. तसंच ही योजना मागे घेण्याचीही मागणी केली आहे.

‘अग्नीपथ’ मागे घेण्याची मागणी

केंद्राने लागू केलेल्या अग्निपथ योजनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. मालेगावात अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. मालेगावात येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्रित येत या तरुणांनी केंद्राच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. ‘अग्निपथ’ योजना तत्काळ रद्द करुन सैन्यभरती पूर्वीप्रमाणे सुरु ठेवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्यासंख्येने तालुक्यातील सैन्यभरतीची तयारी करणारे तरुण उपस्थित होते.

बीडमध्येही निदर्शनं

देशभरात अग्निपथ योजनेला विरोध होत असताना त्याचे पडसाद बीडमध्ये देखील पाहायला मिळाले. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर डेमोक्रोटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी देखील करण्यात आली. अग्निपथ योजना बंद नाही केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा विध्यार्थी संघटनेने दिला आहे.