Malegaon Crime : चिमुरडीच्या हत्येने अख्खं शहर हादरलं… मालेगाव बंद, मोर्चातून उसळला संताप; आंदोलक हिंसक

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याने तीव्र जनक्षोभ उसळला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मालेगाव बंदची हाक दिली असून, नागरिकांनी जोरदार निदर्शने केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. निष्पाप मुलीला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, अशी जनतेची मागणी आहे. या घटनेने संपूर्ण मालेगाव हादरले आहे.

Malegaon Crime : चिमुरडीच्या हत्येने अख्खं शहर हादरलं... मालेगाव बंद, मोर्चातून उसळला संताप; आंदोलक हिंसक
मालेगावमध्ये जनआंदोलन
| Updated on: Nov 21, 2025 | 2:35 PM

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे. चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकटवले असून आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.याप्रकरणातील आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात येणार होतं, मात्र प्रचंड जनक्षोभ, लोकांचा संताप यामुळे वातावरण तापलेलं आहे. चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्यादोच्या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थ अतिशय संतापले आहेत. याप्रकरणाचा निषेध काढण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. क्रर हा शब्दही कमी पडेल असा गुन्हा आणि अत्याचर करणआऱ्या त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला जाहीर फाशी द्या अशीच प्रत्येकाची मागणी असून मालेगाव कोर्टाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली.

अनेकांनी तर कोर्टातही शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांची समजूत काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही अखेर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी काही आंदोलकांवर सौम्य लाठीचार्जही केला. पोलिसांनी कसंबलं त्यांना कोर्टाच्या आवाराबाहेर हाकलण्यात आलं. मात्र तरीही लोकांचा संताप कायम असून हातात निषेधाचे फलक घेऊन, जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी न्यायाची मागणी केली आहे. निष्पाप मुलीच्या हत्येनंतर संपूर्ण मालेगावमध्ये दु:खाचे आणि संतापाचे वातावरण असून मुलीला न्याय द्या, आरोपीला फासावर चढवा, तोपर्यंत आमच्या मनाला शांति मिळणार नाही, असाच गावकऱ्यांचा आक्रोश पहायला मिळत आहे.

मालेगाव बंदची हाक

डोंगराळीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळपासून मालेगाव मध्ये शुकशुकाट बघायला मिळत असून दुकान देखील बंद असल्याचे बघायला मिळत आहे. मालेगावच्या इतिहासात मालेगाव पहिल्यांदाच बाह्य आणि मध्य हा शहरातील दोन्ही भाग बंद आहे. दुपारी 11 वाजता निषेध मोर्चा निघाला. निषेध व्यक्त करत मालेगावच्या रामसेतू पुल ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हा आक्रोश मोर्चा होता. त्या पार्श्वभूमीवर मालेगाव मध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला, मात्र लोकांच्या रेट्यापुढे,आक्रोशापुढे पोलिसांचीही ताकद कमी पडत्ये की ताय असं वाटू लागलं.

धुळे- साक्री तालुक्यातील दहिवेल येथे कॅण्डल मार्च आयोजन

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील भयानक कृत्य घटना घडली. विकृत मानसिकतेने चिमुकली वर एका नराधमाने त्या मुलीला लैंगिकतेचे क्रुर कृत्य करुन अत्याचार करून तिच्या तोंडावर दगड टाकून निर्घृण हत्या केली. अश्या हरामखोराला फाशीची शिक्षा त्वरित सुनावली पाहिजे. या निषेधार्थ दहिवेल गावातुन मुक मोर्चा व कॅण्डल मार्च काढण्यात आला.व दहिवेल गावातील ग्रामस्थ आणि दहिवेल परिसरातील नागरिकांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

नेमकं काय घडलं ?

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावात 3 वर्षांच्या चिमुकलीवर 24 वर्षांच्या नरामधमाने अत्याचार केला आणि नंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानतंर आरोपीला न्यायालयात हजर करताना संतप्त नागरिकांनी न्यायालयासमोर गर्दी केली. गर्दी वाढल्यावर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला.

16 नोव्हेंबर रोजी 4 वर्षांची पीडित मुलगी घराच्या अंगणात खेलत होती, त्यावेळी गावतल्याच विजय संजय खैरनार या 24 वर्षांच्या नरधमाने तिला चॉकलेटचं आमिष दाखवलं. त्यानंतर आरोपी त्या पीडित मुलीला गावातल्या एका टॉवरजवळ घेऊन गेला. तिथे तिच्यावर अत्याचर करून विजय खैरनारने चिमुरडीची हत्या केली. मुलगी बेपत्ता झाल्याने घरच्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध सुरू केला. धक्कादायकत म्हणजे या शोधमोहिमेत आरोपीही सहभागी होता. त्यानंतर मुलगी गायब झाल्यची माहिती पोलिसांना देण्यात आली.

दरम्यान गावातल्याच एका महिलेने आरोपी आणि त्या लहान मुलीला टॉवरजवळ जाताना पाहिलं होतं, तिने ही माहिती पोलिस व गावकऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विजय खैरनार याला ताब्यात घेतलं. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबियांनी आक्रोश केला. आरोपीला फाशी व्हावी अशीच मागणी असून आज मोर्चादरम्यानही नागरिकांन याचा पुनरुच्चार केला.