धक्कादायक ! बारामतीत बैल खरेदीच्या व्यवहारातून गोळीबार, 1 गंभीर जखमी

बारामती तालुक्यातील निंबुत गावत एक धक्कादायक घटना घडली आहे. शर्यतीच्या बैलावरून अचानक गोळीबार झाला, त्यामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरूवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली. रणजीत निंबाळकर जखमी व्यक्तीचे नाव असून ते फलटण येथील रहिवासी आहेत.

धक्कादायक ! बारामतीत बैल खरेदीच्या व्यवहारातून गोळीबार, 1 गंभीर जखमी
| Updated on: Jun 28, 2024 | 10:23 AM

बारामती तालुक्यातील निंबुत गावत एक धक्कादायक घटना घडली आहे. शर्यतीच्या बैलावरून अचानक गोळीबार झाला, त्यामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरूवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली. रणजीत निंबाळकर जखमी व्यक्तीचे नाव असून ते फलटण येथील रहिवासी आहेत. गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर या दोघांमध्ये शर्यतीच्या बैलाचा व्यवहार झाला होता. रणजीत निंबाळकर बैल परत आणायला गेले असताना गोळीबार झाला, ज्यात निंबाळकर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर गावात एकच खळबळ माजली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच या प्रकरणी गौरव काकडे, सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि मुलगा गौतम काकडे यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय घडलं ?

बारामती तालुक्यातील निंबुत येथे गोळीबार झाला आहे. शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून झालेला वाद वाढला आणि त्यात संतापलेल्या काकडे यांनी गोळीबार केल्याचे समजते. या गोळीबारात रणजीत निंबाळकर हे गंभीररित्या जखमी झाले. या घटनेनंतर संदर्भात अंकिता रणजीत निंबाळकर यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे आणि तीन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत निंबाळकर यांनी एक वर्षांपूर्वी निंबुत येथील गौतम काकडे यांच्याकडून 61 लाख रुपयांना सर्जा हा बैल विकत घेतला होता. त्यानंतर 24 जून रोजी रणजीत निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजी काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला. यावेळी गौतम काकडे यांनी आधी पाच लाख रुपये दिले होते. मात्र त्यांच्याकडून उर्वरित 32 लाख रुपये येणं बाकी होते. दरम्यान, व्यवहार झाला, त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव निंबुत येथील त्यांच्या घरी नेला. उर्वरित पैसे आणण्यासाठी निंबाळकर गेले असताना त्यांच्यात वाद झाला आणि तो प्रचंड वाढला. त्याच वादावरून रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. रणजीत निंबाळकर यांच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.