AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra vidhan parishad : एकनाथ शिंदेंची दिल्लीत जाऊन फिल्डिंग, उमेदवारी मिळाल्यावर मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

विधानपरिषद आणि राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत दौरा केला. तर शिंदे महाराष्ट्रात पोहोचल्याननंतर मंगेश चिवटे यांना पुणे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारीची घोषणा केली.

Maharashtra vidhan parishad : एकनाथ शिंदेंची दिल्लीत जाऊन फिल्डिंग, उमेदवारी मिळाल्यावर मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
eknath shinde newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 06, 2026 | 7:51 AM
Share

महाराष्ट्रात 5 जागांवर विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. या पाचही जागांच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीची धावाधाव सुरू झाली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे काही पक्षात बंडखोरी पाहायला मिळत आहे. तर काही पक्षात नाराजीनाट्य देखील दिसून येत आहे. काही जागांवर महायुतीतही बंडखोरी झाल्याचे समोर आलं आहे. नागपुरात भाजप नेते अनिल सोले यांनी बंडखोरी केली. तर पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप-शिंदे गट आमनेसामने उभे ठाकले आहेत. भाजपकडून कौस्तुभ गावडे मैदानात उतरले आहेत. तर शिंदे गटाने मंगेश चिवटे यांना उमेदवारी देऊ केली आहे. शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर मंगेश चिवटे यांनी जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत विधानपरिषदेची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर महाराष्ट्रात परतल्यानंतर मंगेश चिवटे यांना विधानपरिषदेसाठी एबी फॉर्म पाठवला. त्यानंतर पुणे शिक्षक विधान परिषदमधून मंगेश चिवटे यांना शिवसेनेने एबी फॉर्म घेतला. यावेळी एबी फॉर्म मिळाल्यानंतर चिवटेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले. त्यानंतर चिवटे आज सकाळी 10 वाजता पुणे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मंत्री भरत गोगावले,खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी शक्ती प्रदर्शन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. टीव्ही9 शी संवाद साधत असतानाच मंगेश चिवटे यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ए बी फॉर्म दिला.

 शिंदे काय म्हणाले?

मंगेश चिवटे यांच्या हातात एबी फॉर्म देऊन त्यांना खांद्यावर घेऊन शिवसैनिकांनी केला आनंद साजरा. यावेळी चिवटे यांनी  पुणे शिक्षक मतदारसंघातून आजपर्यंत केलेल्या कामामुळे मी शंभर टक्के खात्रीने निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला. मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून अद्याप अर्ज मागे घेण्याला वेळ आहे. या काळात महायुतीमधील नेत्यांमध्ये चर्चा होईल. चर्चेनंतर निर्णय होईल. मंगेश चिवटे हे पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा लढणार असून त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म दिलाय. आता अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची प्रकिया सुरू होईल. याकाळा बरंच काही होईल’, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Follow Us
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण