AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंगेश चिवटे लढणार; एबी फॉर्म घेतला, एकनाथ शिंदेंकडून थेट घोषणा, पुण्यातील जागेसाठी महायुतीत जुंपली

Pune Graduate Constituency: पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मंगेश चिवटे लढणार असल्याची एकनाथ शिंदेंनी घोषणा केली आहे. यामुळे आता महायुतील संघर्ष अधिक वाढला आहे.

मंगेश चिवटे लढणार; एबी फॉर्म घेतला, एकनाथ शिंदेंकडून थेट घोषणा, पुण्यातील जागेसाठी महायुतीत जुंपली
| Updated on: Oct 05, 2026 | 8:08 PM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीला गेले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदींमध्ये एक तास चर्चा झाली आहे. यानंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मी पंतप्रधानांसोबत महाराष्ट्रातील दुष्काळासंदर्भात बोललो आहे. ते महाराष्ट्राला जमेल तशी मदत करणार आहेत. असं आश्वासन मोदींनी मला दिले आहे, असं शिंदेंनी सांगितलं आहे. यानंतर विधानपरिषद निवडणुकीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आज नरेंद्र मोदींसोबत बरीच चर्चा झाली. माझी त्यांच्यासोबत चर्चा होत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाची मोदींनी माहिती घेतली आहे. पाणी आणि चाऱ्याची काय परिस्थिती आहे? कुठे आणि किती नुकसान आहे? अशा सगळ्या विषयांवर चर्चा केली. मी त्यांना सांगितलं, अनेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. मंत्र्‍यांनी शेतकऱ्यांना धीर दिला होता. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. तसेच एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्यांनी पुण्याची जागा मंगेश चिवटे लढणार, असे ठामपणे सांगितलं आहे. यासाठी त्यांनी एबी फॉर्म घेतला असल्याचे यावेळी शिंदेंनी सांगितलं आहे.

ते म्हणाले की, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. त्यामुळे शेतकरी संकटात असताना आम्ही हात आकडता घेणार नाही. नरेंद्र मोदी सरकारचे २५ वर्ष पूर्ण होत आहेत. हा अतिशय मोठा पल्ला आहे. नरेंद्र मोदी एकही दिवस सुट्टी घेत नाहीत. असा प्रधानमंत्री देशाला लाभला आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. अशा स्थितीत भारताची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आणलेली आहे. देशाचे हित प्रथम असा त्यांचा अजेंडा आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नरेंद्र मोदींचं कौतुक केले आहे.

एकनाथ शिंदेंनी सांगितलं की, आरोप करणं सोपं आहे पण ज्या लोकांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडणुकीत गाडून टाकले आहे, ते गाडण्याची भाषा करत आहेत. पंतप्रधान देशाला पुढे नेत आहे. देशाचा विकास करत आहेत. पंतप्रधानांबाबत एवढी जळजळ का? त्यांच्याबद्दल सन्मान असला पाहिजे, अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली आहे.

ते पुढे म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागे घेण्यासाठी अजून वेळ आहे. या मधल्या काळात महायुतीची चर्चा होईल. त्यानंतर निर्णय होणार आहे. पण पुण्याच्या जागेवरून मंगेश चिवटे लढणार आहेत. त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. महायुतीत चर्चा झाली होती.

Follow Us
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?