AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? मनोज जरांगेंची रुग्णालयातून मोठी घोषणा, म्हणाले, आता मुंबईत…

फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी रुग्णालयातून पुन्हा मुंबईत जाऊन आंदोलन करणार असल्याचे जाहीर केलं आहे.

Manoj Jarange : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? मनोज जरांगेंची रुग्णालयातून मोठी घोषणा, म्हणाले, आता मुंबईत...
manoj jarange news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 12:36 PM
Share

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली जात आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची घोषणा केली होती. काही आठवड्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यांनी आंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलं होतं. त्यांनी अंतरवालीतून पुढे मुंबईत उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते. मुंंबईच्या उपोषणाला परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील यांनी तिकडे जाणार असल्याचा निश्चय केला होता. परंतु सलग 18 दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली होती. एकीकडे त्यांचा दौरा बीडच्या पाटोड्यात पोहोचला होता. परंतु तब्येत बिघडल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं. सरकारच्या प्रतिनिधींच्या उपस्थित उपोषण मागे घेतलं.  आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. आता पाटोड्यातून पुढे मुंबईत आंदोलन करणार असल्याची घोषणाच मनोज जरांगे यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांची उपोषणादरम्यान तब्येत बिघडल्यानंतर उपोषण स्थगित केलं होतं. फडणवीस सरकारमधील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जरांगेंनी उपोषण सोडलं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना 90 दिवसांची मुदत सरकारला दिली होती. तर सरकारने देखील मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास अनेक मागण्या पूर्ण केल्याचा दावा केला होता. परंतु ओबीसीतून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. त्यामुळेच आंदोलनाचा नारा जरांगेंनी दिला होता. यावेळी त्यांनी जात पडताळणी समिती देखील रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु सरकारमधील अनेकांनी या मागणीचा विरोध केला होता. त्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे विविध मागणीसह ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठाम होते. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘आमची लढाई सुरू आहे. माझं शरीर उपोषणाचं राहिलं देखील नाही. रस्त्यावरील लढाई करतो. अंतरवाली आणि मराठा समीकरण कधीच सुटणार नाही. आता अंतरवालीत आंदोलन होणार नाही. तेथील आंदोलन स्थगित केलं. आमचं आंदोलन पोटोद्यापर्यंत गेलं आहे. अंतरवालीत आंदोलन होणार नाही. तेथील लोकांनी रक्त सांडलं. तेथील ओबीसी बांधवांनी वावर देखील दिले. मराठा समाज कधीच विसरणार नाही. तीन वर्ष झाले. पाटोद्यापर्यंत आंदोलन गेलं आहे. आता तीन महिन्याचा अवधी दिला आहे. तिथून पुढे मुंबई आंदोलन होईल’.

Follow Us
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती