AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला 500 कोटी दिले? शिंदेंनी दिल्लीत काय सांगितलं? मला उत्तर द्या; जरांगेंचा एकनाथ शिंदेंना थेट सवाल

मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जरांगे यांच्या 500 कोटींच्या दाव्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या.

मला 500 कोटी दिले? शिंदेंनी दिल्लीत काय सांगितलं? मला उत्तर द्या; जरांगेंचा एकनाथ शिंदेंना थेट सवाल
manoj jarange Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 20, 2026 | 2:57 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावरील मेळाव्यात सत्ताधारी नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रूपयांवरून एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मला पाचशे कोटी रुपये दिले आहेत, असं तुम्ही भाजपला काय सांगितलं, असं म्हणत मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना थेट सवाल केला आहे. जरांगे यांनी प्रश्न करत एकनाथ शिंदेंना आज उत्तर देखील मागितलं आहे. मनोज जरांगे यांच्या दाव्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मला सात आठ महिन्यापूर्वी एक गोष्ट कळली. मी मनातून काढली. अंतरवलीत उपोषणाला बसल्यावर आठव्या नवव्या दिवशी मला एक गोष्ट कळली. मी या ठिकाणी सांगत आहे. गोष्ट लय भयंकर आहे. मला काहीच सूचेना. म्हणून तुमच्यासमोर मला उत्तर घ्यायचं आहे. भयानक गोष्ट शिजली. दोन ते अडीच वर्षापूर्वी. मोठं षडयंत्र ठरलं. सांगणाऱ्याने तेव्हा सांगितलं नाही. आता सांगितलं. मला याचं उत्तर हवं. मी टीका करत नाही. बदनामी करत नाही. मी फक्त एकनाथ शिंदे यांना उत्तर मागत आहे. याचं उत्तर शिंदेंनी आजच्या दसऱ्या मेळाव्यात द्या. हवं तर तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत उत्तर द्या’.

‘दिल्लीचे भाजपचे काही, महाराष्ट्रातील भाजपचे काही, शिंदे तुम्ही भाजपच्या लोकांना माझ्याबद्दल असं सांगितलं का, जरांगेंना ५०० कोटी रुपये द्यायचे. तुम्ही भाजपकडून ५०० कोटी घेऊन मला दिलेत असं तुम्ही भाजपच्या लोकांना सांगितलं का. ते लोक कुजबूज करत आहेत. जरांगे पाटील यांना श्रीकांत शिंदे यांच्याकडून ५०० कोटी दिले असं सांगितलं. तुम्ही असं सांगितलं का. तुम्ही मला ५०० कोटी दिले का. तुम्ही दिले नसेल तर भाजप तुम्हाला संपवतंय की तुम्ही मला संपवतंय याचा छडा मी लावल्याशिवाय राहणार नाही. मी सोडणार नाही. भाजपची अंतर्गत चर्चा सुरू आहे, असे ते पुढे म्हणाले.  

‘आता खोट्या केसेस होतील काळजी करू नका. तुमचा बदला दोन वर्षांनी घेतल्याशिवाय राहणार नाही. जर नाही झालं. तर मुंबईला जायच्या तयारीला लागा. आमच्या विरोधात बोलताना मर्यादेत राहून बोला… नाहीतर जशास तसे उत्तर मिळणार, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!