AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यामुळे शिंदे शिवसेनेतील गटा-तटाचं राजकारण उघड, एका गटाचा विरोध असताना दुसऱ्या गटाने..

Manoj Jarange Patil : 'कुणीही विरोध करू द्या आम्ही मात्र पाटलांसोबत' एकनाथ शिंदे शिवसेनेतील परस्परविरोधी भूमिका समोर आली आहे. एकागटाने मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंबद्दल बोलल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे. तर दुसऱ्या गटाने वेगळचं काम केलं आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यामुळे शिंदे शिवसेनेतील गटा-तटाचं राजकारण उघड, एका गटाचा विरोध असताना दुसऱ्या गटाने..
Manoj Jarange Patil-Eknath Shinde
| Updated on: Oct 20, 2026 | 8:15 AM
Share

अशोक काळकुटे, प्रतिनिधी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज नारायणगडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. मराठा समाज बांधवाना मनोज जरांगे पाटील संबोधित करणार आहेत. सकाळी 10 वाजता मनोज जरांगे नारायण गडाच्या दिशेने रवाना होतील. राज्यभरातून मराठा समाज बांधव आज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार आहेत. नारायण गडावरून मराठा आरक्षण आंदोलनाला नवी दिशा मिळणार का? आणि जरांगे कोणती भूमिका स्पष्ट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नारायण गडावरील दसरा मेळावा याकडे केवळ मराठा समाजाचाच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध आहे. विरोधानंतरही दसरा मेळावा होत असताना माजी मंत्री तानाजी सावंतांच्या सहकाऱ्यांकडून जेवण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला सुरुवातीला शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाकडून विरोध करण्यात आला. विरोधानंतर देखील शेकडो एकरवर नारायण गडावर हा दसरा मेळावा होत आहे. विरोधानंतर ही दसरा मेळावा होत असताना आज गडावर जाणाऱ्या लाखो लोकांच्या जेवण, पाण्याची व्यवस्था मंत्री तानाजी सावंत यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. एका गटाकडून विरोध तर दुसऱ्या गटाकडून मदत याची चर्चा होत आहे. कुणीही विरोध करू द्या आम्ही मात्र पाटलांसोबत आहोत, आज आम्ही मंत्री तानाजीराव सावंत साहेबांच्या सहकार्यातून लाखो लोकांच्या जेवण,पाण्याची व्यवस्था केली आहे, असं या सहकाऱ्यांनी म्हटलं आहे.

जशास तसे उत्तर दिले जाईल

मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला शिवसेनेचा विरोध असल्याने बीडमधील वातावरण तापलं आहे. मराठवाड्यात सध्या दुष्काळ आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला विरोध केला जात आहे. मुंबईतील शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. त्या ठिकाणी दुष्काळ नाही असे शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी म्हटले आहे. श्री क्षेत्र नारायण गडावरील जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंबद्दल बोलल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराच शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी दिला आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष