AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट!

Manoj Jarange Patil Health: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यांच्या या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे. पण आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावला असल्याचे समोर आले आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट!
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 16, 2026 | 1:41 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यांच्या या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे. पण आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावला असल्याचे समोर आले आहे. आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिश सोळुंके यांनी अपडेट दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबर रोजी मुंबईकडे प्रस्तान केलं आहे. परंतु उपोषणामुळे वाटेतच त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली असून, त्यांना अॅडमिट होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

काय म्हणाले डॉक्टर?

बीडचे डॉ. सतिश सोळुंके यांनी सांगितले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याची तपासणी केली. त्यांना रुग्णालयात अँडमिट करण्याचा सल्ला दिला. सलाईन घेऊन प्रवास करता येणार नाही. बऱ्यापैकी डिहायड्रेशनचा त्रास आहे. डिहायड्रेशन कंट्रोल करणार आहे.

उपोषणाचा 19वा दिवस

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 19 वा दिवस आहे. सलग 19 दिवसांपासून त्यांचं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण सुरू आहे. यापूर्वी ते सलाइन घेत होते. मात्र, मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी सर्व काही बंद केले. आता त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी मुंबईत उपोषणाची घोषणा केली होती. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे प्रस्थान केलं आहे. आज त्यांचा मुक्काम हा अहिल्यानगरमधील श्रीगोंदा येथे असणार आहे.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच