Manoj Jarange Hunger Strike On Maratha Reservation LIVE : परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट
Manoj Jarange Patil Hunger Strike On Maratha Reservation LIVE Updates in Marathi : मराठा आरक्षणाची मागणी करत आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आजपासून अंतरवाली सराटत उपोषणास बसणार आहेत. अंतरवली सराटीमध्ये हळू हळू मराठा समाज बांधव जमायला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होईल.

मराठा आरक्षणासंदर्भातील आपल्या विविध मागण्यांवर ठाम असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे अस्त्र उपसलं आहे. आजपासून ते जालन्यातील अंतरवाली सराटी येथील परिसरात ते रखरखत्या उन्हात उपोषणाला बसणार आहेत. थोड्याच वेळात त्यांच्या उपोषणाला सुरूवात होईल. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे शिष्टमंडळ भेटल्यावर देखील मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम होते. दरम्यान आज मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या लेखी स्वरूपात मान्य होण्याची शक्यता आहे. त्यांच्या उपोषणाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान जरांगेंना वेगळ आरक्षण द्या, आमच्या ताटातलं देऊ नका. बोगस ओबीसी आमच्यात आल्यास समाज पेटून उठेल. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर रस्त्यावर उतरू असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. यासह राज्य, देश-विदेश, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्याचं सर्वे लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
LIVE NEWS & UPDATES
-
परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट
परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांची सरकारवर टीका केली आहे. जरांगे यांची मागणी काही वेगळी नाही. फक्त मागण्यांची पूर्तता करण्याचा विषय आहे. – उष्माघाताने जरांगे यांना काही झाल्यास सरकार जबाबदार असेल, असे बंडू जाधव म्हणाले.
-
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात दोन तरुणांचा शॉक लागून मृत्यू
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कपीलापुरी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. शेतातील विद्युत पंप पाण्यातून बाहेर काढताना विजेचा तीव्र शॉक लागून अनिल श्रीधर देवळकर जैन आणि आक्षय बिभीषण कुंभार या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
-
-
गोंदियात पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ
नवतपा सुरू असून गोंदिया जिल्ह्याचे तापमान 45 अंशांवर पोचलेले आहे. अशातच आज सायंकाळच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली असून कापून झालेल्या धान पिकाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.. तर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्या पासून दिलासा मिळाला आहे.
-
विषारी दारुकांड प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सीआयडीने हाती घेतली
पुणे येथील विषारी दारु कांड प्रकरणाच्या तपासाची सूत्र सीआयडीने हाती घेतली आहे. दापोडी पोलीस स्टेशनमध्ये सीआयडीचं पथक साडे सात तास ठाण मांडून होतं.सकाळी 10 वाजता आलेल्या या पथकाने सर्व कागदपत्रांसह काही आरोपींना ही सोबत घेतलं आणि सायंकाळी साडे पाच वाजता ते पुण्यातील सीआयडी कार्यालयाकडे रवाना झालेत.
-
धाराशिव : परंडा तालुक्यात विजेचा शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कपीलापुरी येथे शेतातील विद्युत पंप पाण्यातून बाहेर काढताना विजेचा शॉक लागून अनिल श्रीधर देवळकर जैन आणि अक्षय बिभीषण कुंभार या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
-
टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला
पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे टीएमसीचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे
-
सोलापूर – करमाळ्यात वीज प्रश्नावरून शेतकरी आक्रमक
करमाळ्यात वीज प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उन्हात ठिय्या आंदोलन केले. अपुऱ्या आणि विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या करमाळा तालुक्यातील करंजे येथील शेतकऱ्यांनी महावितरणने दिलेल्या आश्वासनाची मुदत संपून 40 दिवस उलटले तरी वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने करमाळा महावितरण कार्यालयासमोर करंजे ग्रामस्थांनी उन्हात ठिय्या आंदोलन केले आहे.
-
बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरण; साक्षीदाराला भावाकडूनच धमकी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्ष देऊ नको आणि ते प्रकरण मिटवून घे. असे म्हणत धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांना सख्या भावानेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
-
माझ्याकडून प्राजक्त तनपुरे यांना शुभेच्छा – सुप्रिया सुळे
मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपात प्रवेश केला, यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, काल मला प्राजक्त तनपुरे भेटले. त्यांच्या काहीतरी अडचणी असतील. काल आमची चर्चा झाली, सर्वच गोष्टी कॅमेरावर सांगता येत नाहीत. त्यांना माझ्या शुभेच्छा.
-
मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केले आहे. आज सायंकाळी आमदार प्रसाद लाड आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी प्रसाद लाड संभाजीनगरमध्ये दाखल झालेआहेत. 5 वाजता प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील अंतरवाली सराटीसाठी रवाना होणार आहेत.
-
प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश; कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपात प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाने अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची ताकद देखील वाढणार आहे.राहुरी शहरातील त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. तनपुरे समर्थकांनी हातात भाजपचे झेंडे गळ्यात भगवे उपरणे घालून जोरदार घोषणाबाजी केली.
-
सांगली-सातारा विधान परिषद निवडणूकीत महायुती मध्ये बिघाडीची शक्यता ?
सांगलीतून शिवसेना शिंदे पक्षाने महायुतीत फडकवला बंडाचा झेंडा. शिवसेना शिंदे पक्षाचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक तानाजी पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज. शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला आहे.
-
हिंगोली विधान परिषदेच्या जागेसाठी 28 उमेदवारांकडून 67 नामनिर्देशन पत्र खरेदी
परभणी-हिंगोली विधानपरिषदमध्ये आतापर्यंत 28 उमेदवारांकडून 67 नामनिर्देशन पत्र खरेदी करण्यात आले आहेत. मात्र अद्याप एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याचं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक राहिल्याने परभणी -हिंगोली विधान परिषद मतदारसंघात घडामोडींना वेग आला आहे.
-
सीएनजीच्या दरवाढीनंतरही पंपांवर सीएनजी भरण्यासाठी वाहनांची गर्दी
पेट्रोल, डिझेल दरवाढीनंतर आता सीएनजीच्या ही दरात पंधरा दिवसात दोन रुपये 85 पैशांची दरवाढ झाल्याने वाहनधारकांची जमाच्या दरात वाढ होत असल्याने डोकेदुखी वाढली आहे. आज सीएनजीसाठी लासलगाव येथे प्रति किलोला 96 रुपये 50 पैसे मोजावे लागत आहे. दरवाढीनंतर सीएनजी भरण्यासाठी वाहनधारकांची अनेक कंपनीवर पुरेसा पेट्रोल मिळत नसल्याने गर्दी होत आहे
-
गणेश गीते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश गीते दाखल झाले आहेत. गणेश गीते आज दोन उमेदवारी अर्ज करणार आहेत. अपक्ष आणि एबी फॉर्म न जोडता भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार आहे.
-
दारुत मिथेनॉल, 4 आरोपींना 8 जूनपर्यंत कोठडी
आरोपींनी दारुत मिथेनॉल मिसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय… प्रकरणात आतापर्यंत 8 जण अटकेत… योगेश वानखेडेसह 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी….
-
चंद्रकांत मालकर यांनी बकरा कुर्बानीची परवानगी मागितल्याचं समोर
घाटकोपरच्या सागर पार्कमध्ये भाजपच्या ईशान्य मुंबईचे जिल्हा महामंत्र्यांनी बकरा कुर्बानीची परवानगी मागितल्याचं समोर. चंद्रकांत मालकर यांनी बकरा कुर्बानीची परवानगी मागितल्याचं समोर. चंद्रकांत मालकरांकडून पक्षानं खुलासा मागितला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालकरांना पत्र लिहून रोष व्यक्त केला. सोसायटीत कुर्बानी होऊ नये यासाठी सोमय्यांचा विरोध होता
-
उन्हात बसू नका, विखेंची जरांगेंना विनंती
मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीत भर उन्हात शेतात बाज टाकून आमरण उपोषण सुरू… तर उन्हात बसू नका, विखेंची जरांगेंना विनंती… दरम्यानं उन्हात मला चटके बसले तर सरकार लवकर भर उन्हात काम करेल… जरांगेंचं उपोषण सुरूच
-
मनोज जरांगेंच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक- फडणवीस
मनोज जरांगेंच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक. जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षणाबाबत निर्णय घेऊ. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही- फडणवीस
-
गडचिरोली जिल्ह्यातील 50 हजार शेतकरी ई पीक पासून वंचित
गडचिरोली जिल्ह्यातील 50 हजार शेतकरी ई पीक पासून वंचित. इंटरनेट मोबाईल नेटवर्क अभावी शेतकऱ्यांचे ई पीक झालेच नाही.शेतकऱ्यांना कर्ज मिळेना अशी गंभीर परिस्थिती.पुढच्या हंगामासाठी शेतकरी पैसा आणणार तरी कुठून? शेतकऱ्यांना मोठा प्रश्न?
-
विधान परिषदेवर माझी वर्णी लागेल अशी मला अपेक्षा – प्राजक्त तनपुरे
आज मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत आहे. विधान परिषदेवर माझी वर्णी लागेल अशी मला अपेक्षा आहे. सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतलाय. जयंत पाटील, शरद पवारांशी बोलण्याची माझी हिंम्मत झाली नाही. मी सुप्रिया सुळेंकडे माझी आपबिती मांडलीये असं प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं.
-
पुण्यात विषारी दारु मृत्यू प्रकरण युवक काँग्रेसचं आंदोलन
पुण्यात विषारी दारु मृत्यू प्रकरण युवक काँग्रेसचं आंदोलन. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त. उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन. काल रोहित पवार यांच्या नेतृत्वात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ती दारुभट्टी फोडली होती.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक दाखल. सरकारी डॉक्टर पाहणीसाठी दाखल. मनोज जरांगे पाटील ऊन्हात आमरण उपोषणाला बसले आहेत.
-
मनोज जरांगे पाटील यांना धनगर समाजाचा पाठिंबा
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाचे नेते दाखल. बारामती येथून यशवंत संघर्ष सेनेच्या वतीने जरांगे पाटलांना पाठिंबा. मनोज जरांगे पाटलांनी उन्हात बसून आंदोलन करू नये ही विनंती. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. त्यामुळे आपण उपोषण करू नये. धनगर समाजाच्या संघटनेतर्फे विनंती
-
हे 70 वर्षांनंतरही आरक्षण देणार नाहीत – करुणा मुंडे
“70 वर्ष अगोदर पासून मराठा आरक्षण विषय सुरू आहे. पुढे 70 वर्ष बसून आंदोलन केले तरी पण हे सरकार आरक्षण देणार नाही. हे 70 वर्षांनंतरही आरक्षण देणार नाही. कारण यांना याच विषयावर जातीपातीचं राजकारण करायचे आहे” असं करुणा मुंडे म्हणाल्या.
-
ओबीसींचं आरक्षण अबाधित- मुख्यमंत्री
ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केले आहे. एका समाजाचं काढून दुसऱ्याला द्यायचं असं आम्ही केलं नाही. करणार नाही. ओबीसींनी घाबरण्याचं कारण नाही, त्यांचंही समाधान करू. आम्ही निर्णय घेऊ, पण ओबीसींवर अन्याय करणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
-
महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांना उमेदवारी?
अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाल्याची सूत्रांची माहिती आहे. हर्षजित देशमुख हे नागपूर मधील प्रसिद्ध उद्योजक आहे… मागील काही महिन्यांपासून त्यांनी अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी आपली चाचपणी केली होती. आजच हर्षदजीत देशमुख नामांकन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. अमरावती विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून प्रवीण पोटे तर काँग्रेस कडून हर्षदजित देशमुख यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.
-
जरांगे पाटील यांनी सावलीत बसावे -विखे पाटील
नवीन डॉफ्ट येईपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी उन्हात बसू नये तर सावलीत बसावे अशी आग्रही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर मला हे भोगू द्या अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली. मी सावलीत बसलो तर समाजाला उन्हाळा सहन करावा लागेल असे जरांगे पाटील म्हणाले.
-
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे -राधाकृष्ण विखे पाटील
मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण घ्यावे, त्यांच्या मागण्याविषयी सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी निदान सावलीत तरी बसावे असे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
-
मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रिया हलगर्जी केल्याप्रकरणी कन्नडच्या उपविभागी अधिकाऱ्यांना नोटीस
मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रिया हलगर्जी केल्याप्रकरणी कन्नडच्या उपविभागी अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. काल मनोज जरांगे पाटलांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. विभागीय आयुक्त सोबत झालेल्या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी दखल घेतली होती.प्रमाणपत्र वाटप दिरंगाई केल्याचे पुढे चौकशी सुरु करण्यात आली.
-
मनोज जरांगे पाटलांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर पथक दाखल
मनोज जरांगे पाटील यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं पथक दाखल झाले आहे. हे पथक त्यांची तपासणी करणार आहे. भर उन्हात त्यांचे उपोषण होत असल्याने त्याचा मोठा फटका त्यांच्या प्रकृतीला बसू शकतो. त्यामुळे डॉक्टरांचं पथक तैनात करण्यात आले आहे.
-
देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया
मराठा समाजाच्या संदर्भात पुन्हा एकदा सांगतो, जेवढे निर्णय मी घेतले, शिंदे साहेबांनी घेतले तेवढे इतिहासात कधी झाले नाही. हे निर्णय घेत असताना संविधान, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं पालन करावं लागेल. त्या निर्देशाचं पालन न करता निर्णय घेतला तर फक्त प्रसिद्धी मिळेल
-
अंतरावालीत तापमान सध्या 34 अंश सेल्सिअसवर
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. शेतशिवारात ते उपोषण करत आहेत. सध्या मे महिना असल्याने कडाक्याचे उन्ह आहे. सध्या अंतरावालीत तापमान 34 अंश सेल्सिअसवर आहे. काही वेळात तापमान वाढू शकते.
-
या मागण्यांकरिता मनोज जरांगे पाटील उपोषणाला..
मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या. कोल्हापूर, सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा. महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या. आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा, यासह अन्य मागण्यांकरिता जरांगे उपोषणाला बसले आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरहून विखे पाटील जरांगेंच्या भेटीला..
मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. शेतीशिवारातच यावेळी ते उपोषण करत आहे. मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याकरिता विखे पाटील जालन्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
-
मनोज जरांगे उपोषणाला बसल्यानंतर मराठा समाज आक्रमक..
जालन्यात समृद्धी महामार्गावर मराठा समाजाचा रस्ता रोको. समृद्धी महामार्गावर नाव्हा शिवारात मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला. गेल्या अर्धा तासापासून रस्ता रोको सुरू आहे. तणाव वाढण्याची शक्यता. मोठ्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर.
-
मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवालीतील शेतशिवारात उपोषण..
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावलीतील शेतशिवारात आपल्या उपोषणाला सुरूवात केली. यावेळी त्यांच्यासोबत अन्य काही कार्यकर्तेही उपोषणाला बसली आहेत.
-
सरकारची आता इथेच चर्चा भर उन्हात- जरांगे
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केली. यादरम्यान त्यांनी म्हटले की, आता सरकारसोबत इथेच भर उन्हात चर्चा होणार. सरकारला इथेच चर्चेकरिता यावे लागेल.
-
मनोज जरांगे पाटील रडले, उपोषणाला सुरूवात
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केली. उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी सरकारला मोठा इशारा दिला. यादरम्यान ते थेट रडताना दिसले. भर उन्हात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यावर घेत नाही, असेही त्यांनी म्हटले.
-
मनोज जरांगे पाटील यांचं भरउन्हात उपोषण सुरू
भरउन्हात मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. शेतात बाज टाकून जरांगे यांच्या उपोषणाला सुरूवात. सरकारशी आता उन्हात, इथेच चर्चा करणार – मनोज जरांगे पाटील
-
मी इथे तडफडून उन्हात मरायला तयार आहे, मी हटायला तयार नाही – मनोज जरांगे पाटील
सरकारला जे करायचं ते करू द्या, दगा देऊ द्या, विश्वासघात करू द्या, मी इथे तडफडून उन्हात मरायला तयार आहे. त्यांनी गोळ्या घालून मारलं तरी मरायला तयार आहे. मी हटायला तयार नाही – मनोज जरांगे पाटील
-
मी माझ्या समाजासाठी मरायला तयार – मनोज जरांगे पाटील
मला माझा समाज, समाजातील लेकरं महत्वाची आहेत. मी माझ्या समाजासाठी मरायला तयार – मनोज जरांगे पाटील
-
मनोज जरांगे पाटील उपोषणस्थळी निघाले
मनोज जरांगे पाटील उपोषणस्थळी निघाले. सरकार काहीतरी तोडगा काढेल,असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
-
एकदा हल्ला झालाय पुन्हा करू नये – मनोज जरांगे यांचा इशारा
मी उपोषणाला बसलो आणि नाही बसलो तरी मंत्री येणारच नाही. मी 10 वाजता उपोषणाला बसणारच. मुख्यमंत्री महोदयांना सांगतोय की, एकदा हल्ला झालाय आता पुन्हा ते करू नये. हल्ले करू, पोलिसांना लाठीचार्ज करू, असं केलं तर त्यांना राज्यात अतिजड जाईल – मनोज जरांगे यांचा इशारा.
-
सातारा संस्थानचं GR काढणं गरजेचं आहे – मनोज जरांगे पाटील
सातारा संस्थानचं GR काढणं गरजेचं आहे. सातारा संस्थानचं GR काढायला काही अडचण नाही. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा – मनोज जरांगे पाटील
-
मी उपोषण करण्यावर ठाम – मनोज जरांगे पाटील
मंत्री भेटायला येतील, मी माझं कर्तव्य पार पाडतोय. मी उपोषणावर ठाम आहे – अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे यांचा माध्यमांशी संवाद.
-
मनोज जरांगे यांचं आजपासून उपोषण, प्रमुख मागण्या काय ?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीत उपोषणास बसणार आहेत. 58 लाख मराठ्यांच्या नोंदीवरून जात प्रमाणपत्र वाटप सुरू करा. सातारा संस्थानचं गॅझेट लागू करण्यासाठी जीआर काढा, अशा जरांगे पाटील यांच्या 2 प्रमुख मागण्या आहेत
-
मनोज जरांगे पाटील उपोषण स्थळी दाखल
मनोज जरांगे पाटील उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. आजपासून कठोर उपोषण, माघार घेणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून उपोषण, अंतरवली सराटीमध्ये मराठा बांधव जमायला सुरूवात
आजपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. अंतरवली सराटी मध्ये हळू हळू मराठा समाज बांधव जमायला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधणार असून उपोषणाला सुरूवात होईल.