Manoj Jarange Patil : आधी 500 कोटींचा बॉम्ब, आता शिंदेंच्या प्रतिक्रियेनतंर थेट पुरावे बाहेर काढणार, मनोज जरांगेंची थेट घोषणा!

मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मी कोणालाही 500 कोटी रुपये दिलेले नाहीत. मी कोणाकडूनही 500 कोटी रुपये घेतलेले नाहीत, असे शिंदे यांनी सांगितले आहे.

Manoj Jarange Patil : आधी 500 कोटींचा बॉम्ब, आता शिंदेंच्या प्रतिक्रियेनतंर थेट पुरावे बाहेर काढणार, मनोज जरांगेंची थेट घोषणा!
eknath shinde and manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2026 | 7:31 PM

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे यांनी भाजपाकडून 500 कोटी रुपये घेऊन ते मला दिलेले आहेत, अशी भाजपात कुचबूज सुरू आहे, असा दावा जरांगे यांनी केलाय. तसेच भाजपा शिंदे यांना संपवत आहे की शिंदे मला संपवू पाहात आहेत, याचा मी छडा लावणार आहे असा इशाराच जरांगेंनी देऊन टाकलाय. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलीय. जरांगे यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान त्यांनी दिलेय. त्यानंतर आता जरांगे यांनी थेट पुरावे देण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याची घोणषणा केलीय.

एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिय दिली?

मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “मी कोणालाही 500 कोटी रुपये दिलेले नाहीत. मी कोणाकडूनही 500 कोटी रुपये घेतलेले नाहीत. मनोज जरांगे ज्या आधारावर बोलत आहेत, त्याची अगोदर त्यांनी शहानिशा करायला हवी होती,” असे शिंदे म्हणाले. तसेच मनोज जरांगे यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते द्यांनी द्यावेत. संबंधित यंत्रणांकडे ते पुरावे द्यावेत. त्यानंतर त्यांच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे, असे आव्हानही त्यांनी दिले. मनोज जरांगे हे मराठा समाजाचे काम करत आहेत. त्यानी ते करावे. त्याचे राजकारण करू नये, असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी दिला.

Loading...

मनोज जरांगे थेट पुरावे देणार?

आता मनोज जरांगे यांनी शिंदे यांचा आव्हान स्वीकारले आहे. ते उद्या (22 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन जी कुजबूज चालू आहे त्याविषयी सगळे पुरावे देणार आहेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना “मी ज्या वेळी आधार सांगेल त्यावेळी एकनाथ शिंदे यांना त्यांचीच लाज वाटेल. एकनाथ शिंदे यांना पुरावे हवे असतील तर मी उद्या 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत मी जी कुजबूज चालू आहे, ती सगळी सांगतो,” असं जरांगे म्हणाले आहेत.

मनोज जरांगे यांनी काय आरोप केले?

मनोज जरांगे यांनी आपल्या नारायणगडावरील दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केल होते. मी भाजपाकडून 500 कोटी रुपये देऊन जरांगे पाटील यांना दिले आहेत, असे तुम्ही भाजपाच्या नेत्यांना सांगितले आहे का? भाजपाचे नेते कुजबूज करत आहेत. जरांगे पाटील यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते 500 कोटी रुपये पोहोचले आहेत, असं तुम्ही भाजपाला सांगितले आहे का? असे सवाल जरांगे यांनी केले आहेत. तसेच तुम्ही मला हे पैसे दिले नसतील तर भाजपा तुम्हाला संपवतंय की तुम्ही मला संपवत आहात? याचाही मी छडा लावणार आहे, असं खुलं आव्हान जरांगे यांनी शिंदेंना दिलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us