राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची मोठी मागणी; सरकार मागणी पूर्ण करणार?

| Updated on: Nov 08, 2023 | 3:17 PM

छत्रपती संभाजीनगरात मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यात त्यांनी सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत दिवाळी साजरी करणार नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची मोठी मागणी; सरकार मागणी पूर्ण करणार?
andolak Manoj Jarange Patil
Follow us on

संभाजीनगर  | 8 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नऊ दिवसांनी उपोषण सोडले. मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांचा अवधी दिला आहे. उपोषणा दरम्यान मनोज जरांगे यांनी एक उपमुख्यमंत्री आरक्षणात काड्या घालतो आहे असे विधान करुन अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. फडणवीस यांना भेटायला यायचं असेल तर त्यांनी कुणाला भेटायचं हा ज्याचा प्रश्न आहे. तुम्ही फडणवीसांना भेटणार का ? या प्रश्नावर जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण घेऊन यावं मग आम्हाला भेटाव अशी आमची इच्छा आहे, मग आम्ही त्यांच्या गळ्यात पडतो असेही जरांगे यांनी म्हटलं आहे.

छत्रपती संभाजीनगरात मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, काल सरकार कडून फोन आला होता. टाईम बाँड देण्यासाठी आजचा दिवस वाढवून द्या असं सरकारतर्फे सांगितलं आहे. यामुळे उद्या शंभर टक्के घेऊन येतील. अन् जर उद्या नाही आले तर मग सांगतो त्यांना. फडणवीस यांनी भेटायला कुणाला यायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही आरक्षणासाठी लढतो आहे. माझी ताब्यात ठीक आहे. दोन तीन दिवसात काम सुरू करेल. सरकारी पातळीवर वेगाने काम सुरू आहे. सरकारतर्फे जिल्ह्याजिल्ह्यात कक्ष स्थापन केले असून मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्र पडत आहेत.

ओबीसी नेते एकवटतील किंवा नाही तो भाग वेगळा आहे. सामान्य ओबीसी बांधव म्हणतात पुरावे सापडले तर मराठ्यांना आरक्षण मिळावे. तुम्ही आमचं हिसकावून घेताय असं केवळ नेते म्हणत आहेत. पुरावा नसताना आम्हाला प्रमाणपत्रं मिळत आहेत, असे नाही. आम्ही पुरावे देऊन प्रमाणपत्र घेत आहोत. ओबीसी नेते विरोध करत आहेत सामान्य लोक नाहीत असे जरांगे यांनी सांगितले. ओबीसी नेत्यांची आमच्या तालुक्यात सभा होत असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र एखाद्याच्या जमिनीचे पुरावे त्याच्याकडे असतील तर जमीनवर त्यांचा हक्क आहे, ती जमीन त्यांना मिळावी तसेच कुणबी पुराव्याचं आहे. ओबीसी नेते कुणबी पुरावे असताना आरक्षण देऊ नका म्हणत असाल तर तुम्ही मराठ्यांच्या गरिब मुलांवर का कोपला आहात असंच म्हणावं लागेल असेही ते म्हणाले.

तर त्याचं नाव जाहीर करणार

पूर्वी आम्ही चळवळीत नव्हतो. ५० टक्क्यांवर मराठ्यांचे आरक्षण टिकणार नाही. अन् आम्हीच ओबीसीत आहे हे कळल्यानंतर आम्ही ही मागणी केली आहे. आम्हाला ओबीसीमध्ये घ्या,अन् मग १०० नाही १५० टक्क्यांवर आरक्षण वाढवा. आमच्या मराठा समाजाचं वाटोळा आमच्या नेत्यांनी केलं. स्वतः मंत्री मुख्यमंत्री झाले. त्यांनी समाजाला साथ दिली नाही. मराठा नेत्यांनी इतरांना आरक्षण दिलं मात्र समाजाला दिलं नाही. २४ तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर कोणी आरक्षण दिलं नाही ते नाव जाहीर करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी ठणकावलं आहे.

जरांगे पाटील यांची मागणी

माझा दौरा दिवाळी नंतर सुरू होणार. आरक्षण मिळेपर्यंत फटाके वाजवणे नाही. माझ्या भावाच्या घरात अंधार झाला. यामुळे दिवाळी साजरी करणार नाही. माझ्या भावांनी बलिदान दिलं. मी कशी दिवाळी साजरी करू? राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यावा, आत्महत्या केलेल्याना निधी व नोकरी द्यावी, त्यानं आधार नाही. त्यांना आधार द्यावा ही विनंती, त्यांच्या लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवण्यासाठी बैठकीत निर्णय घ्यावा अशीही मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.